शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने संस्कृत दिनानिमित्त ‘संस्कृत साहित्यातील पर्यावरणविषयक जाणीव’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले


सध्याच्या पर्यावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी प्राचीन भारतीय पर्यावरणीय विचारांची कालसुसंगतता तज्ज्ञांनी अधोरेखित केली

Posted On: 01 SEP 2026 2:51PM by PIB Mumbai

नागपूर, 1 सप्‍टेंबर 2026

 

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने  28 ऑगस्ट 2026 रोजी संस्कृत दिनानिमित्त "संस्कृत साहित्यातील पर्यावरणविषयक जाणीव" या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले होते. उत्तराखंड संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रमाकांत पांडे यांनी ऑनलाइन पद्धतीने बीजभाषण केले आणि भारतीय ज्ञान परंपरेत अंतर्भूत असलेला  निसर्गाबद्दलचा आदर अधोरेखित केला. "माता भूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः" या वैदिक उक्तीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, निसर्गाशी सुसंवाद साधणे हा भारतीय विचारसरणीचा दीर्घकाळापासून अविभाज्य भाग राहिला आहे आणि आजही तो पर्यावरणाशी संबंधित समकालीन आव्हानांच्या दृष्टीने सुसंगत आहे.

विद्यापीठाच्या  कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. त्यांनी संस्कृत भाषेची कालसुसंगतता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात संशोधन आणि उपयोगाच्या क्षमतेवर प्रकाश टाकला. संस्कृत भाषेचा अधिक व्यापक अभ्यास आणि वापर याला  चालना देण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक प्रगतीशी या भाषेची सांगड घालण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

संस्कृत साहित्य विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात संस्कृत, भारतीय ज्ञान परंपरा आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर चर्चा झाली. या कार्यक्रमात प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी संस्कृत साहित्यातील पर्यावरणीय ज्ञानाची आजच्या पर्यावरणीय समस्यांच्या संदर्भातील उपयुक्ततेवर विचारमंथन केले. दीपप्रज्वलन आणि मंगलाचरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर 'स्कूल ऑफ लिटरेचर'चे अधिष्ठाता प्रा. अवधेश कुमार यांनी स्वागतपर भाषण केले.

संस्कृत साहित्य विभागाचे प्रभारी आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. जगदीश नारायण तिवारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रदीप यांनी आभार प्रदर्शन केले.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2305453) अभ्यागत कक्ष : 13
Read this releasein: English