वस्त्रोद्योग मंत्रालय
वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून वस्त्रोद्योग संशोधन संस्थेच्या समन्वय समितीच्या दुसऱ्या बैठकीचे आयोजन
Posted On:
29 AUG 2026 7:45PM by PIB Mumbai
वस्त्रोद्योग मंत्रालयाने आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे वस्त्रोद्योग संशोधन संस्थेच्या, समन्वय समितीच्या दुसऱ्या बैठकीचे आयोजन केले. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलम शमी राव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. देशभरातील वस्त्रोद्योग संशोधन आणि विकास उपक्रमांमध्ये समन्वय बळकट करणे, कार्यक्षमता वाढवणे आणि फलनिष्पत्ती-केंद्रित दृष्टिकोनाला चालना देण्याच्या दृष्टीने ही बैठक एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.

दिवसभर चाललेल्या सखोल विचारमंथन सत्राच्या स्वरूपात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये संशोधनातील प्राधान्यक्रम, तंत्रज्ञान विकास, नवोपक्रम, उद्योग क्षेत्राशी संलग्नता , संशोधन व विकासातून प्राप्त निष्पत्तींचे व्यावसायीकरण आणि वस्त्रोद्योग संशोधन संघटनेचे संस्थात्मक बळकटीकरण या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

समन्वय समितीच्या पहिल्या बैठकीनंतरच्या विविध उपक्रमांच्या प्रगतीचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. उप समित्यांची स्थापना,उत्कृष्टता केंद्रांची ओळख तसेच तंत्र वस्त्रोद्योगातल्या नव्याने उदयाला येणाऱ्या क्षेत्रात सल्लामसलत यासह इतर मुद्यांवरही बैठकीत चर्चा झाली.
***
निलिमा चितळे/राजेश शिरभाते/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2304597)
अभ्यागत कक्ष : 10