सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
जुलै 2026 मध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात 6.7% वाढीची नोंद
Posted On:
28 AUG 2026 4:00PM by PIB Mumbai
|
जुलै 2026 मध्ये, उत्पादन क्षेत्रातील 7.3% वाढ आणि वीज व वायू पुरवठा क्षेत्रातील 8.7% च्या भक्कम वाढीमुळे औदयोगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी ) वार्षिक आधारावर 6.7% वाढ नोंदवली गेली.
|
औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा (आयआयपी ) त्वरित अंदाज प्रत्येक महिन्याच्या 28 तारखेला (किंवा 28 तारखेला सुट्टी असल्यास पुढील कामाच्या दिवशी) प्रसिद्ध केला जातो. हा निर्देशांक स्रोत एजन्सींकडून प्राप्त झालेल्या डेटाच्या आधारे तयार केला जातो, एजन्सींना हा डेटा उत्पादक कारखाने किंवा आस्थापनांकडून प्राप्त होतो. आयआयपीच्या पुनरावलोकन धोरणानुसार पुढील प्रकाशनांमध्ये या त्वरित अंदाजांमध्ये सुधारणा केली जाते.
2.ठळक वैशिष्ट्ये:
i. जुलै 2026 या महिन्यासाठी आयआयपी वाढीचा दर 6.7 टक्के आहे, जो जून 2026 महिन्यात 7.3 टक्के (त्वरित अंदाज) होता.
ii. जुलै 2026 या महिन्यासाठी खाण आणि उत्खनन, उत्पादन, वीज आणि वायू पुरवठा आणि पाणी पुरवठा, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन, या क्षेत्रांचा वाढीचा दर अनुक्रमे (-) 0.9 टक्के, 7.3 टक्के, 8.7 टक्के आणि 7.4 टक्के आहे.
iii. जुलै 2025 मधील 117.0 च्या तुलनेत जुलै 2026 मधील आयआयपीचा त्वरित अंदाज 124.8 वर आहे.
iv. उत्पादन क्षेत्रात, NIC 2-अंकी स्तरावरील 23 पैकी 19 उद्योग गटांनी जुलै 2025 च्या तुलनेत जुलै 2026 मध्ये सकारात्मक वाढ नोंदवली आहे.
v. "मोटर वाहने, ट्रेलर आणि सेमी-ट्रेलरचे उत्पादन" या उद्योग गटात "ऑटो कॉम्पोनन्ट्स, सुटे भाग आणि ऍक्सेसरीज", "प्रवासी वाहने" आणि "व्यावसायिक वाहने" या वस्तूंच्या गटांनी वाढीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
vi. वापर-आधारित वर्गीकरणानुसार, जुलै 2026 या महिन्यासाठी प्राथमिक वस्तूंचा निर्देशांक 115.9, भांडवली वस्तूंचा 141.8, मध्यम वस्तूंचा 130.9 आणि पायाभूत सुविधा/बांधकाम सामग्रीचा 136.2 आहे.
3. जुलै 2026 या महिन्याच्या आयआयपीच्या त्वरित अंदाजासोबतच, स्रोत एजन्सींकडून प्राप्त झालेल्या अद्ययावत माहितीच्या आधारे जून 2026 मधील निर्देशांकांचे अंतिम पुनरावलोकन करण्यात आले आहे.
4. जुलै 2026 चे त्वरित अंदाज आणि जून 2026 चे अंतिम पुनरावलोकन अनुक्रमे 88.9 टक्के आणि 93.0 टक्के भारानुसार प्रतिसाद दरावर संकलित केले गेले आहेत.
5. क्षेत्र , उप-क्षेत्र , राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरणाच्या 2-अंकी स्तरावर (NIC-2025) आणि वापर-आधारित वर्गीकरणानुसार जुलै 2026 च्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या त्वरित अंदाजाचा तपशील अनुक्रमे विवरण पत्रे I, II (A, B, C, D) आणि III मध्ये दिला आहे. तसेच,वापरकर्त्यांना औद्योगिक क्षेत्रातील बदल समजून घेता यावेत यासाठी विवरण पत्र IV मध्ये उद्योग गट (NIC-2025 च्या 2-अंकी स्तरांनुसार), क्षेत्रे आणि उप-क्षेत्रांनुसार गेल्या 13 महिन्यांचे महिनानिहाय निर्देशांक दिले आहेत.
6. ऑगस्ट 2026 चा आयआयपी सोमवार, 28 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध केला जाईल.
टीप: -
1. हे प्रसिद्धीपत्रक (इंग्रजी आणि हिंदी आवृत्ती) मंत्रालयाच्या http://www.mospi.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.
2. आयआयपीशी संबंधित सविस्तर माहिती
https://esankhyiki.mospi.gov.in/macroindicators?product=iip या लिंकवर उपलब्ध आहे.
***
निलिमा चितळे/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2304343)
अभ्यागत कक्ष : 7