ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारचा टप्याटप्प्याने हस्तक्षेप
दिल्ली- एनसीआर परिसरात कांद्याची 35 रुपये किलो दराने विक्री, कांद्याचा पुरवठा पुरेसा
कांदा एक्सप्रेसमुळे कांद्याच्या उपलब्धता चळवळीला गती, राखीव साठयामुळे किमती स्थिर
Posted On:
27 AUG 2026 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2026
देशात कांदे, सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात मिळावे, हे सुनिश्चित करण्यासाठी, केंद्र सरकारने उपाययोजना सुरु केल्या आहेत. सरकारच्या हस्तक्षेपामुळे, राखीव साठयातील कांदा किरकोळ बाजारात आणि दिल्ली-एनसीआर परिसरात मोबाइल वितरण केंद्रांवर 35 रुपये किलो दराने उपलब्ध आहे. सध्याच्या बाजारपेठेतील परिस्थितीची बघता, त्याला प्रतिसाद म्हणून सरकारने ही पावले उचलली आहेत. या मागचा उद्देश, ग्राहकांना कांदा सहज उपलब्ध करुन देणे, दरवाढीचा दबाव कमी करणे आणि बाजारात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध राहील याची खात्री करणे हा आहे.
कांदा एक्सप्रेस उपक्रमामुळे, उत्पादक प्रदेशांमधून राखीव साठयातील कांदा प्रमुख ग्राहक केंद्रांपर्यंत पोहोचविण्यास मदत झाली असून, सरकारच्या मालवाहतूक व्यवस्थेमुळे अधिक बळकटी मिळाली आहे.
2024-25 या वर्षात 14 रेल्वे रेकद्वारे सुमारे 12 हजार मेट्रिक टन ‘बफर स्टॉक’मधील कांदा देशातील पाच शहरांमध्ये पोहोचविण्यात आला. 2025-26 मध्ये या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. या काळात 86 रेल्वे रेकद्वारे सुमारे 88 हजार मेट्रिक टन कांदा देशभरातील 16 शहरांमध्ये पोहोचवण्यात आला.
आताच्या हस्तक्षेपाअंतर्गत, कांदे रेल्वे आणि रस्ते मार्गाद्वारे पोहचवला जात आहे. राखीव कांद्याची शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक आणि कार्यक्षम वितरण सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय गोदाम महामंडळाला देखील या व्यवस्थेत सहभागी करून घेण्यात आले आहे.





* * *
सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2303999)
अभ्यागत कक्ष : 9