ग्रामीण विकास मंत्रालय
देशभरात लखपती दीदींसोबत रक्षाबंधन झाले साजरे
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण भागांतील समृद्धीप्रती सरकारच्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार
Posted On:
27 AUG 2026 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2026
रक्षाबंधन सणाच्या शुभप्रसंगी, केंद्रीय ग्रामीण विकास,कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री, शिवराज सिंह चौहान यांनी देशभरातील स्वयं-सहायता गटांतील (SHG) भगिनी (दीदी) आणि लखपती दीदीं यांच्यासह हा सण साजरा केला आणि त्यांच्या सक्षमीकरण, समृद्धी व कल्याणाप्रती सरकारच्या असलेल्या अतूट वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. हा कार्यक्रम ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत (DAY-NRLM) आयोजित केला गेला होता. यात देशभरातील स्वयं-सहायता गट सदस्यांनी आभासी पद्धतीने सहभाग घेतला.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, शिवराज सिंह चौहान यांनी स्वयंसहायता गटांशी संबंधित महिलांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आणि हा सण विश्वास, जबाबदारी आणि सामूहिक प्रगतीचे प्रतीक आहे,असे सांगितले. रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणींच्या नात्याचा उत्सव नाही, तर महिलांचा सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरण याप्रती समाजाच्या सामायिक जबाबदारीची आठवण करून देणारा सण आहे, असे त्यांनी नमूद केले.

स्वयंसहायता गट हा ग्रामीण परिवर्तनाचा कणा म्हणून उदयास आलेला आहे यावर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला. तसेच सामूहिक प्रयत्न, उद्योजकता व दृढनिश्चय जीवन आणि समाजाचे कसे परिवर्तन घडवू शकतात,हे यातून स्पष्ट होते असेही त्यांनी नमूद केले. लखपती दीदींचे यश हे ग्रामीण महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि नेतृत्व हे संपूर्ण ग्रामीण भारतात सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणण्यासाठी झळाळते उदाहरण ठरले आहे,असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महिला-नेतृत्व विकासाप्रती असलेल्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत, कौशल्य विकास, परवडणाऱ्या कर्जाची उपलब्धता, डिजिटल सक्षमीकरण, उद्योजकता प्रोत्साहन आणि बाजारपेठेशी संबंध अधिक दृढ करून मंत्रालय यापुढेही पाठबळ देत राहील,असे आश्वासन मंत्र्यांनी बचत गटाच्या दीदींना दिले.
* * *
निलिमा चितळे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2303990)
अभ्यागत कक्ष : 9