रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मोठ्या वैतरणा पुलाच्या तातडीच्या संरचनात्मक दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कडून सुरू; राष्ट्रीय महामार्ग एनएच-48 वरील वाहतुकीत बदल

Posted On: 27 AUG 2026 7:23PM by PIB Mumbai

मुंबई, 27 ऑगस्‍ट 2026

 

महाराष्ट्रातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (एनएच-48) 27 ऑगस्ट 2026 रोजी नियमित पूल पाहणीदरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ने 1965 मध्ये बांधलेल्या मोठ्या वैतरणा पुलाच्या संरचनात्मक दुरुस्तीची, तातडीने गरज असल्याचे स्पष्ट केले.

रस्ता वापरकर्त्यांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करता, या दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करण्यात येत आहे. स्थानिक परिस्थिती आणि कामाच्या प्रगतीनुसार हे काम पूर्ण होण्यासाठी साधारणपणे एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

एनएचएआय या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून महामार्ग वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. दुरुस्तीच्या कालावधीत सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येत आहे.

या दुरुस्तीच्या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल एनएचएआयने खेद व्यक्त केला असून या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे आणि संयम बाळगावा, असे आवाहन केले आहे. सर्व महामार्ग वापरकर्त्यांसाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुलभ रस्ते वाहतूक प्रदान करण्यासाठी एनएचएआय कटिबद्ध असल्याचा पुनरूच्चार ‘एनएचएआय’ने केला आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2303925) अभ्यागत कक्ष : 28
Read this releasein: English