सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त गोवा विज्ञान केंद्राच्यावतीने प्रदर्शन, प्रश्नमंजूषा आणि अंतराळविषयक कार्यक्रम

Posted On: 25 AUG 2026 10:15PM by PIB Mumbai

गोवा, 25 ऑगस्‍ट 2026

 

गोवा विज्ञान केंद्राने भारतीय भौतिकशास्त्र शिक्षक संघटनेच्या गोवा येथील प्रादेशिक केंद्राच्या सहकार्याने आज राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला. त्यानिमित्त केंद्राने अंतराळ संशोधन क्षेत्रातील भारताच्या उल्लेखनीय प्रवासाविषयी विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेत जागरुकता आणि रुची निर्माण करणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.

या सोहोळ्याचा भाग म्हणून विज्ञान केंद्राने “प्राचीन आकाशांपासून आधुनिक क्षितिजापर्यंत” नामक विशेष प्रदर्शन भरवले असून जनतेसाठी हे प्रदर्शन 21 ऑगस्ट पासून सुरु झाले. या प्रदर्शनामध्ये इस्रोच्या अवकाश मोहिमा, उपग्रह तंत्रज्ञान, चांद्रयान आन मंगलयान मोहिमा तसेच गगनयान कार्यक्रमासह, अंतराळ संशोधन क्षेत्रातील भारताच्या कामगिरीचे दर्शन घडते.

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचे नमुने देखील या प्रदर्शनात मांडण्यात आले असून त्याद्वारे अभ्यागतांना भारताच्या चंद्र अन्वेषण प्रयत्नांची जवळून ओळख करून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सामान्य जनतेसाठी हे प्रदर्शन 20 सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.

आज, दिनांक 25 ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी अंतराळ संशोधन प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेची सुरुवात लेखी बाद फेरीने झाली. गोवा राज्यातील शाळांमधून आलेल्या 34 संघांनी या फेरीत भाग घेतला. गुणवत्तेच्या आधारावर निवडलेले चार संघ तोंडी फेरीसाठी पात्र ठरले.

या स्पर्धेत भाटीकर मॉडेल माध्यमिक शाळेचा संघ विजयी ठरला.श्री गणेश माध्यमिक शाळेच्या संघाने दुसरा क्रमांक पटकावला तर रोझरी शाळा आणि विवेकानंद ज्ञानमंदिर माध्यमिक शाळा यांच्या संघांनी संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावला.

यावेळी विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतराळ कार्यक्रमावर आधारित विशेष सादरीकरण करण्यात आले. यामध्ये देशाच्या अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्या काळातील  दिवसांपासून आजच्या काळातील यशस्वी मोहिमांपर्यंत भारताच्या अंतराळ क्षेत्रातील वाटचालीचा मागोवा घेण्यात आला तसेच त्यात आगामी मोहिमा तसेच अंतराळ संशोधनातील भविष्यकालीन आकांक्षा यांच्यावर देखील अधिक भर देण्यात आला.

पारितोषिक वितरण समारंभात गोवा विज्ञान केंद्राचे केंद्रप्रमुख अभिमन्यू भेलावे, आयएपीटी-गोवा प्रादेशिक केंद्राचे अध्यक्ष डॉ.सतीश केळुसकर तसेच आयएपीटी-गोवा प्रादेशिक केंद्र सचिव डॉ.रेश्मा राउत देसाई हे मान्यवर उपस्थित होते. प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आली.

अंतराळ विज्ञान क्षेत्रातील वाढती रुची तसेच या क्षेत्रातील भारताच्या यशाचे दर्शन घडवत राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सुमारे 2,000 विद्यार्थी, शिक्षक तसेच जनतेचे प्रतिनिधी यांनी भाग घेतला.

उपरोल्लेखित प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील प्रेरणादायक वाटचालीविषयी अधिकाधिक माहिती जाणून घ्यावी,  असे आवाहन गोवा विज्ञान केंद्राने गोव्यातील जनता विशेषतः विद्यार्थी आणि विज्ञानामध्ये रुची असलेल्या  युवावर्गाला केले आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2303380) अभ्यागत कक्ष : 17
Read this releasein: English