खाण मंत्रालय
केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांच्या हस्ते महत्त्वाच्या खनिजांविषयीच्या नवोन्मेष हॅकेथॉन 2026 ला प्रारंभ
नागपूरच्या ‘जेएनएआरडीडीसी’ या स्वायत्त संस्थेने आयोजित केले हॅकेथॉन
महत्त्वाच्या खनिजांचा शोध आणि तंत्रज्ञान गुप्तचर यंत्रणेसंदर्भात नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी विद्यार्थी, संशोधक, संशोधन आणि विकास संबंधी संस्था, स्टार्ट-अप्स तसेच नवोन्मेषक यांना आमंत्रण
Posted On:
25 AUG 2026 8:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2026
केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी.किशन रेड्डी यांनी आज महत्त्वाच्या खनिजांविषयीचे नवोन्मेष हॅकेथॉन 2026 ची (सीएमआयएच) सुरुवात केली. देशातील विद्यार्थी, संशोधक, शैक्षणिक तसेच संशोधन आणि विकास संबंधी संस्था, स्टार्ट-अप्स तसेच नवोन्मेषकर्ते यांना महत्त्वाच्या खनिजांचा शोध आणि तंत्रज्ञान गुप्तचर यंत्रणेसंदर्भात नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करुन महत्त्वाच्या खनिजांच्या राष्ट्रीय अभियानाची उद्दिष्टे अधिक बळकट करणे हा या हॅकेथॉनचा उद्देश आहे.
या हॅकेथॉनमध्ये सहभागी झालेल्यांना त्यांच्या कल्पना प्रदर्शित करण्यासाठी, तज्ञांचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी आणि भारतातील सुरक्षित आणि आत्मनिर्भर महत्त्वपूर्ण खनिज परिसंस्था उभारण्यात योगदान देण्यासाठीचा मंच या कार्यक्रमामुळे उपलब्ध झाला आहे. या कार्यक्रमाद्वारे दोन समस्या विधानांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येत आहे: लिथियम किंवा आरईई पेग्माटाईट्ससाठी संभाव्यता हीटमॅपचे विकसन आणि ज्ञात खनिज साठ्यांच्या आधारे त्यांची पडताळणी यांचा समावेश असलेले खुल्या डेटामधून खनिज संभाव्यता मॅपिंग; आणि महत्त्वाच्या खनिजांसाठी अंतर्ज्ञानात्मक, वेब-आधारित स्मार्ट संशोधन आणि विकास तसेच पेटंट म्हणजेच बौध्दिक संपदा स्वामित्त मागोवा प्रणाली निर्माण करणे.
केंद्रीय खाण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘जेएनएआरडीडीसी’ या नागपूरच्या स्वायत्त संस्थेने सदर हॅकेथॉन आयोजित केले असून ही संस्था या स्पर्धेचे 2026 साठी यजमानपद देखील भूषवणार आहे. या उपक्रमासाठी संकल्पना सादर करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2026 असून दिनांक 15 ते 17 नोव्हेंबर 2026 या कालावधीत नियोजित भारत खनन सप्ताह 2026 दरम्यान या उपक्रमाच्या विजेत्यांची घोषणा करण्यात येईल.विजेत्या संघाला प्रत्येक समस्या विधानाच्या उपायासाठी पारितोषिके दिली जातील आणि या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला 1.50 लाख रुपयांचे तर दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला 1.00 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
जेएनएआरडीडीसीच्या https://jnarddc.gov.in/ या संकेतस्थळावर हॅकेथॉनविषयीचा सर्व तपशील माहिती, समस्या विधाने, मार्गदर्शक तत्वे आणि नोंदणी सुविधा यांची माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या खनिजांविषयीचे नवोन्मेष हॅकेथॉन 2026 हे महत्त्वाच्या खनिजांसाठी नवोन्मेष-चलित परिसंस्था निर्माण करण्याच्या तसेच तरुण वर्ग, संशोधक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोन्मेषकर्ते यांना भारताच्या खनिज सुरक्षेत आणि तंत्रज्ञानसंदर्भातील आत्मनिर्भरतेत योगदान देण्यासाठी प्रेरित करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.
* * *
सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2303308)
अभ्यागत कक्ष : 17