कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या  'तेजस' कार्यक्रमाचा समारोप; भविष्यातील नेतृत्व घडवण्यावर दिला मोठ्या प्रमाणावर भर

Posted On: 24 AUG 2026 4:39PM by PIB Mumbai


वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडने (WCL) 22 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या ‘तेजस’ (TEJAS) या नेतृत्व विकास उपक्रमाचे पहिले आणि दुसरे मॉड्यूल आणि संगणक-आधारित मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर या कार्यक्रमाचा यशस्वीपणे समारोप केला. हा कार्यक्रम संरचित शिक्षण आणि विकासाच्या माध्यमातून तरुण अधिकाऱ्यांमध्ये नेतृत्व क्षमता, नवोन्मेष, धोरणात्मक विचार आणि संघटनात्मक आकलन वाढवण्यासाठी आखण्यात आला होता. या समारोप समारंभाला डब्ल्यूसीएलचे  अध्यक्ष-आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. हेमंत शरद पांडे; मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेडचे (MECL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक इंद्र देव नारायण; आणि डब्ल्यूसीएलचे संचालक (अर्थसहाय्य व मानव संसाधन)  विक्रम घोष उपस्थित होते.

डॉ. हेमंत शरद पांडे यांनी सहभागींना  संबोधित केले. 'तेजस'चा  समारोप हा एका प्रवासाचा शेवट नसून जबाबदार, सक्षम, धाडसी आणि दूरदर्शी नेतृत्वाच्या दिशेने एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी सहभागींना  या कार्यक्रमादरम्यान मिळवलेल्या ज्ञानाचा त्यांच्या व्यावसायिक कामात वापर करण्याचे, नवोन्मेषाचा स्वीकार करण्याचे, सचोटी आणि संवेदनशीलतेने नेतृत्व करण्याचे आणि संघटनेत सकारात्मक बदलासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.  इंद्र देव नारायण यांनी डब्ल्यूसीएलच्या नेतृत्व विकासाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि तेजससारखे उपक्रम नेतृत्व क्षमता बळकट करण्यात, नवोन्मेष व धोरणात्मक विचारांना प्रोत्साहन देण्यात आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संघटनेला तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे सांगितले.

विक्रम घोष यांनी सहभागींचे आणि या कार्यक्रमाशी जोडलेल्या टीमचे अभिनंदन केले व 'तेजस'  च्या यशाचे कौतुक केले. या उपक्रमाचा दृष्टिकोन व उद्दिष्टे आणि यामुळे तरुण अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या संधींबद्दल त्यांनी आपले विचार मांडले. समारोप समारंभादरम्यान, सहभागींनी तयार केलेल्या विषयांमधून निवडलेल्या अव्वल 3 प्रबंधांचे  सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमातील प्राध्यापक आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला, तर सहभागींनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी या सोहळ्यात उत्साह निर्माण केला.

या समारोप समारंभाला 'तेजस'चे सहभागी, प्राध्यापक, परीक्षक मंडळाचे सदस्य, डब्ल्यूसीएलच्या  विविध क्षेत्रांचे महाव्यवस्थापक आणि डब्ल्यूसीएल मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम अधिक मोठ्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी आणि संघटनेच्या वाढीमध्ये अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी सज्ज असलेल्या, सक्षम आणि भविष्यासाठी तयार असणाऱ्या नेत्यांचे भांडार विकसित करण्याच्या डब्ल्यूसीएलच्या प्रयत्नांमधील आणखी एक पाऊल ठरला.

***

सुषमा काणे/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2302844) अभ्यागत कक्ष : 21
Read this releasein: English