गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दिल्ली बृहद आराखडा 2047: विकसित दिल्ली आणि विकसित भारत 2047 साठी एक मार्गदर्शक आराखडा

प्रविष्टि तिथि: 20 AUG 2026 9:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2026

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार तसेच ऊर्जा मंत्री मनोहर लाल यांनी आज दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजीत सिंग संधू आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री  रेखा गुप्ता यांच्या उपस्थितीत दिल्ली बृहद आराखडा 2047  चे अनावरण केले.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री मनोहर लाल म्हणाले की दिल्लीची वाढती लोकसंख्या आणि शहराचा सर्वांगीण विकास करण्याची गरज लक्षात घेता, दिल्ली बृहद आराखडा 2047 हा राष्ट्रीय राजधानीचे भविष्य घडवण्यात एक मैलाचा दगड ठरेल. त्यांनी सांगितले की या बृहद आराखड्यामध्ये शहराच्या भविष्यातील घरांची गरज पूर्ण करण्यावर भर देत सुमारे 40 लाख नवीन परवडणारी घरे उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे.

ते म्हणाले की सार्वजनिक वाहतूक मार्ग मजबूत करण्यासाठी आणि उत्तम संपर्क व्यवस्था असलेल्या शहरी विकासाला चालना देण्यासाठी यात ट्रान्झिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट धोरणाचा समावेश करण्यात आला आहे. वसाहती अधिक राहण्यायोग्य बनवण्यासाठी निवासी कल्याण संघटना अर्थात रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनना  नोंदणी करण्यास आणि त्याच जागेवर पुनर्विकास धोरणाच्या धर्तीवर पुनर्विकास आराखडा स्वीकारण्यास प्रोत्साहित केले जाईल; यामुळे विद्यमान निवासी क्षेत्रांचा नियोजित पुनर्विकास आणि सुधारणा करणे शक्य होईल.

दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजीत सिंग संधू म्हणाले की माननीय पंतप्रधानांच्या सप्त-धारा या संकल्पनेशी सुसंगत असा दिल्ली बृहद आराखडा 2047 हा वर्टिकल ग्रोथ, ट्रान्झिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट आणि दर्जेदार गृहनिर्माण यासाठी एक भक्कम मार्गदर्शक आराखडा सादर करत आहे. त्याचबरोबर, हा आराखडा   ज्ञान, शिक्षण आणि वैद्यकीय केंद्रांच्या विकासाला चालना देतो आणि दिल्लीचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करणारा आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की दिल्ली बृहद आराखडा 2047 हा विकसित दिल्लीसाठी एक सर्वसमावेशक आराखडा आहे,  याचा उद्देश येणाऱ्या  पिढ्यांसाठी अधिक नियोजित, सुलभ आणि भविष्यासाठी सज्ज अशी राष्ट्रीय राजधानी निर्माण करणे हा आहे.  हा आराखडा दिल्लीमधील गावे आणि अनधिकृत वसाहतींपासून ते जुन्या निवासी वसाहती आणि बाजारपेठांची दखल घेतानाच वाढती लोकसंख्या, वाहतुकीच्या गरजा व प्रदूषण यांसारख्या आव्हानांवर उपाययोजना करणारा आहे.


माधुरी पांगे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2301773) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Tamil