संरक्षण मंत्रालय
65 व्या सुब्रतो चषक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे शानदार सोहळ्यात आंबेडकर स्टेडियम मध्ये उद्घाटन
Posted On:
19 AUG 2026 9:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2026
नवी दिल्ली येथील डॉ. बी.आर.आंबेडकर स्टेडियमवर 65 व्या सुब्रतो चषक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचा 18 ऑगस्ट 2026 रोजी शुभारंभ झाला. उद्घाटनाच्या दिवशी मुख्य सामन्यात कनिष्ठ गटातील मुलींच्या (17 वर्षांखालील) मेघालयच्या संघाने चंदीगडवर विजय मिळवला.
सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आणि एयर ऑफिसर-इन-चार्ज ॲडमिनिस्ट्रेशन एयर मार्शल एस शिवकुमार हे या उद्घाटनाच्या सोहळ्याचे मुख्य पाहुणे होते. त्यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन झाले. भारतीय पुरुष भारोत्तोलक संघाचा स्टार खेळाडू लव्हप्रीत सिंग हा याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होता.
या स्पर्धेत खालील 3 श्रेणींमध्ये एकूण 108 संघ सहभागी झाले आहेत:
- कनिष्ठ गट मुली (17वर्षांखालील)
- कनिष्ठ गट मुले (17वर्षांखालील)
- सब-ज्युनियर मुले (15वर्षांखालील)
प्रत्येक श्रेणीची 8 गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. आपापल्या गटातील विजेते संघ ‘नॉकआऊट’ फेरीत प्रवेश करतील, त्यानंतर अंतिम सामने होतील.
65 वी सुब्रतो चषक स्पर्धा तळागाळातील मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि युवा खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात स्पर्धा करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी आणि नवीन उंची गाठण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे.






* * *
सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2301382)
अभ्यागत कक्ष : 56