सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
एमएसएमई मंत्रालय अत्यंत उत्साहाने हर घर तिरंगा 2026 मोहिमेत झाले सहभागी; वंदे मातरमला 150 वर्षे झाल्याचा उत्सवही केला साजरा
एमएसएमई सचिवांनी, अधिकाऱ्यांना तिरंग्याचे केले वितरण; देशभरातील एमएसएमई कार्यालये ‘सेल्फी विथ तिरंगा’ मोहिमेत झाले सहभागी
प्रविष्टि तिथि:
17 AUG 2026 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2026
देशभरात 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत हर घर तिरंगा अभियान 2026 राबवण्यात येत आहे. या काळात, नागरिकांनी आपल्या घरांवर आणि कार्यस्थळांवर राष्ट्रीय ध्वज फडकवावा आणि तिरंग्याबद्दलचा आपला अभिमान व्यक्त करावा, यासाठी त्यांना प्रेरित करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. तसेच, भारताचे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ ला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, त्याचाही उत्सव साजरा केला जात आहे.

याच अभियानाचा भाग म्हणून, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय- एमएसएमई ने 13 ऑगस्ट रोजी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाद्वारे, देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रध्वजा विषयीचा आदर, अभिमान व्यक्त करण्यात आला. मंत्रालयाच्या अखत्यारीतील, संलग्न आणि क्षेत्रीय कार्यालयांनाही आपापल्या कार्यालयांमधे हा उत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’च्या 150व्या वर्षाचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले, यातून राष्ट्राभिमान आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली.
या उत्सवाचा एक भाग म्हणून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सचिवांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वज तिरंगा वितरित केला आणि हर घर तिरंगा अभियान 2026 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’च्या 150व्या वर्षाचे स्मरण करण्यात आले तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिकरित्या ‘वंदे मातरम्’चे गायन केले. सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अभियानाच्या उद्दिष्टांची तसेच राष्ट्रध्वज योग्य सन्मान आणि आदराने फडकवण्याच्या महत्त्वाची माहिती देण्यात आली.
या उत्सवामुळे देशभक्ती, एकात्मता , लोकसहभाग आणि तिरंग्याबद्दल आदर वाढवण्याप्रति मंत्रालयाची कटिबद्धता अधोरेखित झाली.
* * *
सुषमा काणे/राधिका अघोर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2300687)
आगंतुक पटल : 9