युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
‘माय भारत’ ने महाराष्ट्रात युवकांचा सहभाग आणि नेतृत्व केले बळकट
प्रविष्टि तिथि:
13 AUG 2026 6:48PM by PIB Mumbai
मुंबई, 13 ऑगस्ट 2026
केंद्रीय युवक व्यवहार विभागांतर्गत एक स्वायत्त संस्था असलेल्या ‘माय भारत’ने (पूर्वीचे नेहरू युवा केंद्र संघटन - एनवायकेएस) महाराष्ट्रासह देशभरात विविध युवा विकास आणि स्वयंसेवक कार्यक्रम राबवले आहेत.
2025-26 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एकूण 2,583 कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये 6,86,421 तरुणांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमांनी युवावर्गाला स्वयंसेवा, अनुभवात्मक शिक्षण, नागरी सहभाग, नेतृत्व विकास आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली.
गेल्या तीन वर्षांत राज्यात 22,265 युवा क्लब समाविष्ट करण्यात आले आहेत. हे युवा क्लब तरुणांना समाजभिमुख उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच स्थानिक विकासात योगदान देण्यासाठी व्यासपीठ म्हणून काम करतात.
2025-26 दरम्यान महाराष्ट्रातील 'माय भारत' उपक्रमांसाठी 22.27 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, त्यापैकी 20.64 कोटी रुपयांचा वापर करण्यात आला.
'माय भारत'ने हाती घेतलेल्या उपक्रमांमुळे युवा नेतृत्व मजबूत होण्यास आणि सामुदायिक सहभाग वाढण्यास मदत झाली आहे. स्वयंसेवा आणि अनुभवात्मक शिक्षणासाठी संरचित संधी उपलब्ध करून देऊन हे कार्यक्रम तरुणांना समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच विकासकामांमध्ये सहभागी होण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्यास प्रोत्साहित करतात.
अशी माहिती या संबंधित राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाचे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज लेखी उत्तरात दिले.
पीआयबी मुंबई |सुवर्णा बेडेकर/ नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2299117)
आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English