कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशभक्ती आणि राष्ट्रीय ऐक्य वाढवण्यासाठी ‘डब्ल्यूसीएल’ तर्फे नागपूरमध्ये तिरंगा रॅली

प्रविष्टि तिथि: 13 AUG 2026 5:07PM by PIB Mumbai

नागपूर, 13 ऑगस्ट 2026

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशव्यापी 'हर घर तिरंगा' अभियानाचा एक भाग म्हणून वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने (डब्ल्यू सीएल) आज नागपूर येथील आपल्या मुख्यालयापासून तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. यामध्‍ये  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्साहाने  सहभागी झाले.

सामूहिक वंदे मातरम गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थितांना संबोधित करताना डब्ल्यूसीएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. हेमंत शरद पांडे यांनी राष्ट्रध्वजाचे महत्त्व अधोरेखित केले आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला आदरांजली वाहिली. त्यांनी 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत नागरिकांना आपापल्या घरांवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले. राष्ट्र उभारणीतील डब्ल्यूसीएलचे योगदान स्पष्ट करताना ते म्हणाले की कोळसा उत्पादनाच्या माध्यमातून देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यात कंपनी महत्त्वाची भूमिका बजावते.

डॉ. पांडे यांनी तिरंगा रॅलीला हिरवा झेंडा दाखवला आणि तिचे नेतृत्व केले. ही रॅली सिव्हिल लाइन्स आणि तेलंखेडीमार्गे डब्ल्यूसीएल मुख्यालयात परतली. राष्ट्रध्वज हातात घेऊन देशभक्तीच्या घोषणा देत सहभागींनी देशभक्ती, राष्ट्रीय ऐक्य आणि राष्‍ट्राभिमानाचा संदेश दिला.

या रॅलीत संचालक (वित्त) बिक्रम घोष, संचालक (तांत्रिक/संचालन) संदीप परांजपे, मुख्य दक्षता अधिकारी अजय मधुकर म्हेत्रे आणि इतर वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते.

पीआयबी मुंबई |सुवर्णा बेडेकर/ नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2299112) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English