महिला आणि बालविकास मंत्रालय
लायबेरियाचे संसदीय शिष्टमंडळ आणि महिला विधिमंडळ गटाच्या सदस्यांनी महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांची भेट घेतली
प्रविष्टि तिथि:
11 AUG 2026 6:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2026
महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी नवी दिल्लीतील जीपीओए, ब्लॉक 3 येथे लायबेरियाच्या संसदीय शिष्टमंडळाबरोबर बैठक घेतली. एलेन-अट्टो रेह यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात लायबेरियाच्या सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जचे सदस्य, तसेच लायबेरियाच्या 'विमेन्स लेजिस्लेटिव्ह कॉकस'चे सदस्य आणि संयुक्त राष्ट्रांच्या महिला संघाच्या प्रतिनिधी यांचा समावेश होता. हे शिष्टमंडळ 10 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत साऊथ-साउथ पीअर लर्निंग मिशन अंतर्गत भारताला भेट देत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महिला संघाच्या सहकार्याने आयोजित आणि 'युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर साउथ-साउथ कोऑपरेशन' चे व्यवस्थापन असलेल्या या मोहिमेला भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका सरकारांकडून भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका (आयबीएसए) निधी अंतर्गत अर्थसहाय्य लाभले आहे.

बैठकीदरम्यान, शिष्टमंडळाला महिलांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी भारताने हाती घेतलेल्या प्रमुख उपक्रमांची माहिती देण्यात आली. केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी महिलांकडे राष्ट्रीय विकासातील सक्रिय घटक म्हणून पाहण्याच्या भारताच्या दृष्टिकोनावर भर दिला. तसेच महिलांचे राजकीय प्रतिनिधित्व, महिलावर्गाबाबत संवेदनशील प्रशासन आणि अर्थसंकल्प, महिलांवरील हिंसाचाराबाबत संस्थात्मक उपाययोजना, 'केअर इकॉनॉमी' (देखभाल व सेवा क्षेत्रातील अर्थव्यवस्था) आणि स्थानिक प्रशासनातील महिलांचे नेतृत्व यासारख्या क्षेत्रांमधील महिला सक्षमीकरणाप्रति भारताची कायदेशीर, कार्यक्रम-आधारित आणि संस्थात्मक वचनबद्धता अधोरेखित केली.
दोन्ही बाजूंनी परस्पर हिताच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली आणि साऊथ-साउथ सहकार्याच्या चौकटीत दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत वचनबद्धता व्यक्त केली. लाइबेरियन शिष्टमंडळाच्या प्रमुखांना स्मृतिचिन्ह प्रदान करून आणि त्यानंतर सामूहिक छायाचित्र काढून बैठक संपन्न झाली.


निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2297831)
आगंतुक पटल : 16