दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
गोवा बीएसएनएलने ग्रामीण गोव्यातील भारतनेट एफटीटीएच (FTTH) विस्तारात सहभागी होण्यासाठी स्थानिक उद्योजकांना केले आमंत्रित
Posted On:
07 AUG 2026 4:19PM by PIB Mumbai
गोवा, 7 ऑगस्ट 2026
ग्रामीण गोव्यात हाय-स्पीड इंटरनेट सेवा पोहोचविण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड गोवा विभागाच्या वतीने स्थानिक उद्योजक, युवक, विद्यार्थी आणि स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना भारतनेट एफटीटीएच (Fibre-to-the-Home) विस्ताराच्या कामात भागीदार होण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या डिजिटल भारत निधीअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत असून, भारतनेट प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्याचा उद्देश आहे.
या उपक्रमांतर्गत गोव्यातील सर्व ग्रामपंचायतींना 1 जीबीपीएस क्षमतेच्या हाय-स्पीड इंटरनेट नेटवर्कशी जोडण्याचे नियोजन आहे. त्यानंतर गावांमधील घरे, व्यावसायिक आस्थापना तसेच इतर ग्राहकांना एफटीटीएच सेवा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर केबलद्वारे जोडण्याचे काम ऑक्टोबर 2026 पासून सुरू होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर ग्राहकांच्या घरापर्यंत एफटीटीएच कनेक्शन देण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.
भारतनेटच्या या विस्तारात ‘लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ग्रामपंचायत ठिकाणांपासून ग्राहकांच्या घरांपर्यंत ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी पोहोचविण्यासाठी बीएसएनएल गोवा विभाग स्थानिक भागीदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देत आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण गोव्यात डिजिटल कनेक्टिव्हिटी मजबूत होण्याबरोबरच स्थानिक युवक आणि उद्योजकांसाठी व्यवसाय व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यार आहे.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी आपले अर्ज उपमहाव्यवस्थापक (EB/Marketing), प्रधान महाप्रबंधक कार्यालय, बीएसएनएल, तिसरा मजला, संचार भवन, पणजी, गोवा येथे सादर करावा, असे बीएसएनएल गोवा विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

स्रोत : बीएसएनएल, गोवा/ पीआयबी, पणजी | अंबादास यादव/ प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 2296040)
अभ्यागत कक्ष : 44