कोळसा मंत्रालय
व्यावसायिक लिलावाच्या 15 व्या फेरीत आणि 13 व्या फेरीच्या 2 ऱ्या प्रयत्नात सहा कोळसा खाणींचा यशस्वी लिलाव
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2026 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2026
कोळसा मंत्रालयाने व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाच्या 15 व्या फेरीत आणि 13 व्या फेरीच्या 2 ऱ्या प्रयत्नांतर्गत 06 कोळसा खाणींचा यशस्वी लिलाव केला आहे. मंत्रालयाने 17 एप्रिल 2026 रोजी व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाचा हा टप्पा सुरू केला होता. यानंतर, 03 ऑगस्ट ते 04 ऑगस्ट 2026 दरम्यान लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 06 कोळसा खाणींचा यशस्वी लिलाव झाला. या सहा खाणींपैकी चार खाणींचा पूर्ण शोध घेण्यात आला आहे, तर दोन खाणींचा अंशतः शोध घेण्यात आला आहे. एकत्रितपणे, या खाणींमध्ये सुमारे 1,503.93 दशलक्ष टन भूगर्भीय साठा असून, त्यांची एकूण कमाल उत्पादन क्षमता 11.62 एमटीपीए (दशलक्ष टन प्रतिवर्ष) आहे.
आयोजित केलेल्या लिलावाचा खाणनिहाय निकाल खालीलप्रमाणे आहे:
|
S.
No
|
Name of Block
|
State
|
PRC
(MTPA)
|
Geological Reserves (MT)
|
Closing Bid Submitted by
|
Reserve Price(%)
|
Final Offer( %)
|
|
1
|
Dip Side Ext. of PKOC
|
Telangana
|
2.5
|
181.95
|
The Singareni Collieries Company Limited
|
4.00
|
6.50
|
|
2
|
Dongeri Tal-II
|
Madhya Pradesh
|
2.90
|
158.45
|
Gallantt Ispat Limited
|
5.00
|
6.50
|
|
3
|
Mandla South
|
Madhya Pradesh
|
0.22
|
4.627
|
Qube Commercial Private Limited
|
4.00
|
4.50
|
|
4
|
Margo West
|
Jharkhand
|
NA
|
415.00
|
Jharkahand Exploration and Mining Corporation Limited
|
4.00
|
6.50
|
|
5
|
Margo East
|
Jharkhand
|
NA
|
450.00
|
Jharkahand Exploration and Mining Corporation Limited
|
4.00
|
10.25
|
|
6
|
Tara (Revised)
|
Chhattisgarh
|
6.00
|
293.91
|
CG Syn-Gas and Chemicals Limited
|
4.00
|
37.50
|
या 06 कोळसा खाणींमधून वार्षिक सुमारे ~₹1,983.67 कोटी महसूल मिळण्याचा अंदाज असून, सुमारे ₹1,743 कोटींची भांडवली गुंतवणूक आकर्षित होण्याची आणि 15,710 रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.
2020 मध्ये व्यावसायिक कोळसा खाणकामाच्या सुरवातीपासून, दरवर्षी 377.974 दशलक्ष टन उत्पादन क्षमतेसह एकूण 147 कोळसा खाणींचा यशस्वी लिलाव झाला आहे. एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, या खाणी देशांतर्गत कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढ करतील आणि कोळसा क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनवण्याचे उद्दिष्ट पुढे नेतील. एकत्रितपणे, या कोळसा खाणींमधून ₹48,215 कोटींचा वार्षिक महसूल मिळणे, ₹54,315 कोटींची भांडवली गुंतवणूक उभारणे आणि कोळसाधारक क्षेत्रांमध्ये 4,89,552 रोजगाराच्या संधी निर्माण होणे अपेक्षित आहे.
हे यश कोळसा क्षेत्राला आर्थिक विकासाचा प्रमुख चालक बनवण्याची कोळसा मंत्रालयाची दृढ बांधिलकी पुन्हा अधोरेखित करते.आर्थिक स्थैर्य दृढ करणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि देशाची वाढती ऊर्जा गरज पूर्ण करणे या माध्यमातून हे मंत्रालय अधिक सक्षम, मजबूत आणि खऱ्या अर्थाने 'आत्मनिर्भर भारत'साकार करण्याच्या ध्येयाला पुढे नेत आहे.
सुषमा काणे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2294597)
आगंतुक पटल : 8