संरक्षण मंत्रालय
व्हाईस ॲडमिरल मनीष चड्ढा, एव्हीएसएम, व्हीएसएम, यांनी नौदल संचालन महासंचालक म्हणून कार्यभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
03 AUG 2026 10:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2026
व्हाईस ॲडमिरल मनीष चड्ढा, एव्हीएसएम, व्हीएसएम, यांनी 3 ऑगस्ट 26 रोजी नौदल संचालन महासंचालक म्हणून कार्यभार स्वीकारला.
खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या, 78व्या तुकडीचे माजी विद्यार्थी असलेले व्हाईस ॲडमिरल मनीष चड्ढा,भारतीय नौदलात 1 जुलै 1991 रोजी अधिकारी म्हणून रुजू झाले. फ्लॅग ऑफिसर संचार आणि इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्रातील तज्ञ आहेत. ते वेलिंग्टन येथील संरक्षण सेवा स्टाफ विद्यापीठाच्या 61व्या तुकडीचे माजी विद्यार्थी असून त्यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठातून हायर कमांड कोर्स पूर्ण केला आहे.
आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीत फ्लॅग ऑफिसर यांनी नौदल आणि भूदल या दोन्ही ठिकाणी कमांड, संचालन, संथात्मक आणि कर्मचारी नियुक्ती सारख्या वैविध्यपूर्ण पदांवर काम पाहिले आहे. त्यांच्या प्रमुख सागरी नियुक्त्यांमध्ये कोस्ट गार्ड इंटरसेप्टर बोट CGS-05 आणि भारतीय नौदलाची जहाजे वीर, किरपान आणि म्हैसूर यांच्या कमांडचा समावेश आहे.
फ्लॅग ऑफिसर यांनी मॉस्को येथील भारतीय दूतावासात नौदल सहचारी म्हणूनही काम पाहिले आहे. नौदल मुख्यालयात कार्यरत असताना त्यांनी विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे नेतृत्त्व केले असून त्यामध्ये अतिशय कमी वारंवारतेच्या (VLF) आणि उपग्रह संचाराशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच, त्यांनी 2016 मधील आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू चे संचालक म्हणूनही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
ध्वज अधिकारी पदावर पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी गुजरात नौदल क्षेत्राचे ध्वज अधिकारी कमांडिंग, सहाय्यक कार्मिक प्रमुख (प्रशासन आणि नागरी), महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे ध्वज अधिकारी कमांडिंग आणि सहाय्यक कार्मिक प्रमुख (मानव संसाधन विकास) ही महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
व्हाईस ॲडमिरल पदावर पदोन्नती झाल्यानंतर त्यांची भारतीय नौदल अकादमीचे कमांडंट म्हणून नियुक्ती झाली, या पदावर असताना त्यांच्यावर भविष्यातील नौदलाच्या नेतृत्त्वाला घडवण्याची जबाबदारी होती.
त्यांच्या उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन, या फ्लॅग ऑफिसरना 2025 मध्ये अति विशिष्ट सेवा पदक आणि 2017 मध्ये विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.
(4)LMC0.jpeg)
(5)XC9B.jpeg)

शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2294114)
आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English