कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जुलै 2026 मध्ये देशातील कोळसा उत्पादनात वार्षिक 7.51% वाढ


तर कोळसा वितरणात वार्षिक 17.34% वाढीची नोंद

प्रविष्टि तिथि: 02 AUG 2026 11:00AM by PIB Mumbai

 

जुलै 2025 च्या तुलनेत जुलै 2026 मध्ये भारताच्या एकूण कोळसा उत्पादनात 7.51% ची वाढ झाली आहे. जुलै 2026 मध्ये देशातील एकूण कोळसा उत्पादन 69.75 दशलक्ष टनांवर पोहोचले असून, गेल्या वर्षी जुलैमध्ये हे उत्पादन 64.88 दशलक्ष टन इतके झाले होते. त्याचबरोबर, जुलै 2026 मध्ये कोळशाच्या वितरणात वार्षिक आधारावर 17.34% ची लक्षणीय वाढ दिसून आली. गेल्या वर्षीच्या 73.57 दशलक्ष टनांच्या तुलनेत यंदा या महिन्यात ते 86.33 दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. कोळसा उत्पादन आणि वितरणातील ही वाढ या क्षेत्रातील सातत्यपूर्ण पुरवठा आणि कामकाजातील स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी कोळसा मंत्रालयाची वचनबद्धता व प्रयत्न दर्शवते.

आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये जुलै अखेरपर्यंतचे एकूण कोळसा उत्पादन 302.24 दशलक्ष टन नोंदवले गेले, तर एकूण कोळसा वितरण 354.70 दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत यात 5.87% ची वाढ नोंदवली गेली आहे.

जुलै महिन्यातील उत्पादनाच्या आकडेवारीत 'कोल इंडिया लिमिटेड'ने 50.35 दशलक्ष टनांचे उल्लेखनीय योगदान दिले असून, जुलै 2025 च्या तुलनेत त्यात 8.42% ची वाढ नोंदवली गेली आहे. जुलै 2026 दरम्यान कोल इंडियाने 63.67 दशलक्ष टन कोळशाचे वितरण केले, जे जुलै 2025 मधील वितरणाच्या तुलनेत 17.43% ची वाढ दर्शवते. तसेच, चालू आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये जुलै अखेरपर्यंत कोल इंडियाचे एकूण कोळसा वितरण गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 6.81% ने वाढले आहे.

शाश्वत विकास साधणे, कोळशाची उपलब्धता सुधारणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणे यासाठी कोळसा मंत्रालय कटिबद्ध आहे. या सकारात्मक गतीमुळे, भारताच्या विकास प्रवासाला ऊर्जा देण्यात कोळसा क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

***

यश राणे/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2293328) आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil