संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट प्रकल्पातील पाचव्या नौकेचे जलावतरण

प्रविष्टि तिथि: 01 AUG 2026 8:02PM by PIB Mumbai

 

डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट (डीएससी) प्रकल्पातील पाचवी आणि अंतिम नौका ‘डीएससी ए24’चे 1 ऑगस्ट 2026 रोजी पश्चिम बंगालमधील कोलकातास्थित टिटागढ येथे जलावतरण करण्यात आले. उपनौदलप्रमुख (कार्मिक) व्हाइस अॅडमिरल गुरचरण सिंह यांच्या उपस्थितीत  कमल सिंह यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. भारतीय नौदल तसेच टिटागढ रेल सिस्टिम्स लिमिटेड (टीआरएसएल)च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण नौदल परंपरा आणि शासकीय पद्धतीनुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

डायव्हिंग सपोर्ट क्राफ्टच्या बांधणीचे काम टिटागढ रेल सिस्टिम्स लिमिटेड, कोलकाता यांच्याकडून करण्यात येत आहे. सुमारे 300 ते 400 टन विस्थापन क्षमतेची आणि कॅटमरॅन प्रकारच्या दुहेरी तळाची रचना असलेली ही नौका अधिक स्थिरता, विस्तीर्ण डेक आणि समुद्रातील उत्तम कार्यक्षमता प्रदान करते. त्यामुळे ती डायव्हिंग मोहिमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. या नौकांची रचना आणि बांधणी इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग (आयआरएस)च्या नौदल नियम आणि मानकांनुसार करण्यात आली आहे.

या नौकांच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची डायव्हिंग सहाय्य, पाण्याखालील तपासणी, बचावकार्य आणि किनारी भागातील कार्यवाहीची क्षमता अधिक बळकट होणार आहे.

या नौकांमध्ये वापरण्यात आलेल्या मुख्य आणि सहाय्यक उपकरणांपैकी सुमारे 70 टक्के उपकरणे देशांतर्गत उत्पादकांकडून उपलब्ध करून घेण्यात आली आहेत. त्यामुळे या नौका ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे प्रभावी प्रतीक ठरत आहेत.

***

शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2293157) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी