पर्यटन मंत्रालय
पर्यटन मंत्रालयाकडून महाराष्ट्रात मंजूर झालेल्या पर्यटन पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती
राज्यभरात स्वदेश दर्शन, स्वदेश दर्शन 2.0, आव्हान-आधारित गंतव्य विकास, प्रसाद आणि भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य या योजनांतर्गत प्रकल्पांना मंजुरी
Posted On:
30 JUL 2026 5:12PM by PIB Mumbai
मुंबई,30 जुलै 2026
पर्यटन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की पर्यटन स्थळांच्या पर्यटन पायाभूत सुविधा, सोयीसुविधा आणि अनुभवांची निश्चिती आणि विकास प्रामुख्याने संबंधित राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाद्वारे केला जातो. मात्र, मंत्रालय विविध योजनांद्वारे देशभरात, तसेच आध्यात्मिक, सांस्कृतिक, तीर्थक्षेत्र आणि वारसासंपन्न पर्यटन स्थळांच्या विकासासाठी आर्थिक सहाय्य पुरवते. या योजनांमध्ये स्वदेश दर्शन (एसडी), स्वदेश दर्शन 2.0 (एसडी 2.0), आव्हान-आधारित गंतव्य विकास (सीबीडीडी) आणि तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन व आध्यात्मिक वारसा वृद्धी अभियान (प्रसाद) यांचा समावेश आहे..
भारत सरकारच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य – जागतिक स्तरावरच्या महत्वाच्या पर्यटन केंद्रांचा विकास ( SASCI ) या योजनेअंतर्गत देशातील महत्वाच्या पर्यटन केंद्रांच्या सर्वसमावेशक विकासासाठी राज्यांना आर्थिक मदत देखील दिली जाते, असे मंत्रालयाने सांगितले.
वर नमूद केलेल्या योजनांतर्गत असलेले प्रकल्प संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे राबवले जातात. मंत्रालय नियमित आढावा बैठका, प्रत्यक्ष भेटी आणि इतर देखरेख यंत्रणांद्वारे या प्रकल्पांच्या प्रगतीवर नियमितपणे लक्ष ठेवते आणि आढावा घेते. आर्थिक मदतीचे प्रस्ताव संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे तयार केले जातात आणि निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांची तपासणी केली जाते. निश्चित केलेल्या अटींची पूर्तता आणि निधीच्या उपलब्धतेनुसार आर्थिक मदत दिली जाते.
स्थानिक संस्कृती, परंपरा आणि वारशाचे जतन करताना सर्वसमावेशक आणि शाश्वत पद्धतीने पर्यटनाला चालना देणे, हा मंत्रालयाच्या पायाभूत सुविधा विकास योजनांचा उद्देश आहे. या योजनांतर्गत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा उद्देश पर्यटकांचे अनुभव समृद्ध करणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे हा आहे.
महाराष्ट्र राज्यात वर नमूद केलेल्या योजनांतर्गत मंजूर झालेल्या प्रकल्पांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
(i). स्वदेश दर्शन योजना
(कोटीं रुपयांमध्ये)
|
अ. क्र.
|
प्रकल्पाचे नाव
|
मंजुरीचे वर्ष
|
मंजूर रक्कम
|
अधिकृत रक्कम
|
|
1.
|
सिंधुदुर्ग किनारी परिपथाचा विकास - सागरेश्वर, तारकर्ली, विजयदुर्ग (समुद्रकिनारा आणि खाडी), मिठबाव
|
2015-16
|
19.06
|
17.61
|
|
2.
|
वाकी- अदासा- धापेवाडा- पारडसिंगा- तेलनखेडी- गिरडचा विकास
|
2018-19
|
45.47
|
43.19
|
(ii). स्वदेश दर्शन 2.0 योजना
(कोटीं रुपयांमध्ये)
|
अ. क्र.
|
प्रकल्पाचे नाव
|
मंजुरीचे वर्ष
|
मंजूर रक्कम
|
अधिकृत रक्कम
|
|
1.
|
शिवसृष्टी थीम पार्क
|
2024-25
|
75.47
|
37.74
|
(iii). आव्हान आधारित गंतव्य विकास योजना
(कोटीं रुपयांमध्ये)
|
अ. क्र.
|
प्रकल्पाचे नाव
|
मंजुरीचे वर्ष
|
मंजूर रक्कम
|
अधिकृत रक्कम
|
|
1.
|
अहमदनगर किल्ल्याचा विकास
|
2024-25
|
25.00
|
2.50
|
(iv). तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन व आध्यात्मिक वारसा वृद्धी अभियान (प्रसाद)
(कोटी रुपयांमध्ये)
|
अ. क्र.
|
प्रकल्पाचे नाव
|
मंजुरीचे वर्ष
|
मंजूर रक्कम
|
अधिकृत रक्कम
|
|
1.
|
त्र्यंबकेश्वरचा विकास, नाशिक
|
2017-18
|
45.41
|
38.44
|
(v). भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना
(कोटीं रुपयांमध्ये)
|
अ. क्र.
|
प्रकल्पाचे नाव
|
मंजुरीचे वर्ष
|
मंजूर रक्कम
|
वितरित रक्कम
|
|
1.
|
राम-काल पथाचा विकास, नाशिक
|
2024-25
|
99.14
|
65.43
|
|
2.
|
सिंधुदुर्गातील आयएनएस-गुलदार अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ भित्तिका आणि पाणबुडी पर्यटन
|
2024-25
|
46.91
|
30.96
|
केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी संसदेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
पीआयबी मुंबई |सुषमा काणे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2291836)
अभ्यागत कक्ष : 69