संरक्षण मंत्रालय
रिअर ऍडमिरल श्रीनिवास मद्दुला, व्हीएसएम यांनी पश्चिमी ताफ्याचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला
Posted On:
30 JUL 2026 5:10PM by PIB Mumbai
मुंबई,30 जुलै 2026
रियर ऍडमिरल श्रीनिवास मद्दूला, व्हीएसएम, यांनी 27 जुलै 2026 रोजी व्हाईस ऍडमिरल विवेक दहिया, एनएम यांच्याकडून पश्चिम ताफ्याची कमान स्वीकारली.

1 जानेवारी 1994 रोजी भारतीय नौदलात सामील झालेले फ्लॅग ऑफिसर मद्दूला हे, पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), अमेरिकेच्या व्हर्जिनिया येथील युनायटेड स्टेट्स मरीन कॉर्प्स कमांड अँड स्टाफ कॉलेज, आणि गोव्यातील नेव्हल वॉर कॉलेज या संस्थांचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी नौदलात सागरी आणि किनारी अशा दोन्ही प्रकारच्या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे; यामध्ये 'INFAC T-80', तसेच 'आयएनएस निपात', ' आयएनएस गोदावरी', ' आयएनएस गंगा' आणि ' आयएनएस त्रिकंड' यांसारख्या युद्धनौका आणि 'आयएनएस कदंबा' या बेस डेपो जहाजाचे नेतृत्व करण्याचा समावेश आहे.



या नियुक्तीपूर्वी, त्यांनी नवी दिल्ली येथील नौदल मुख्यालयात 'सहाय्यक नौदल प्रमुख (परदेशी सहकार्य आणि गुप्तचर)' आणि त्याआधी कोची येथील 'दक्षिण नौदल कमांड'मध्ये 'फ्लॅग ऑफिसर सी ट्रेनिंग' म्हणून काम केले आहे.
पीआयबी मुंबई |सुषमा काणे/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2291824)
अभ्यागत कक्ष : 55