श्रम आणि रोजगार मंत्रालय
सदस्यांना जलद सहाय्य मिळवून देण्यासाठी इपीएफओ गोवाद्वारे अद्ययावत व्हॉट्सॲप हेल्पलाइन सुरू
सदस्य, निवृत्तीवेतनधारक आणि नियोक्त्यांना आता त्यांच्या तक्रारी, शंका आणि सेवा-विषयक मदतीसाठी 8788914105 या क्रमांकावर इपीएफओ गोवाशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधण्याची सोय
Posted On:
27 JUL 2026 8:04PM by PIB Mumbai
पणजी-गोवा,27 जुलै 2026
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या गोवा येथील प्रादेशिक कार्यालयाने, राज्यातील ईपीएफ सदस्य, नियोक्ते, निवृत्तीवेतनधारक आणि इतर संबंधित घटकांना आता 8788914105 या अद्ययावत केलेल्या व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांकावर अधिक जलद आणि सोयीस्कर पद्धतीने मदत उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे.
डिजिटल संपर्क अधिक बळकट करण्याबरोबरच प्रादेशिक कार्यालयात न जाता इपीएफओच्या सेवा सहजपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही व्हॉट्सॲप सेवा अद्ययावत करण्यात आली आहे. या हेल्पलाईनद्वारे संबंधित घटकांना आपल्या तक्रारी नोंदवणे, माहिती मिळवणे, सेवेशी संबंधित प्रश्न विचारणे आणि इपीएफओच्या विविध बाबींवर मार्गदर्शन मिळवणे शक्य होईल.
सदस्यांच्या विनंत्यांचे त्वरित आणि प्रभावीपणे निवारण व्हावे यासाठी त्यांनी व्हॉट्सॲप संदेश पाठवताना आपले नाव, युनिव्हर्सल अकाउंट नंबर (युएएन) किंवा पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) क्रमांक (जिथे लागू असेल तिथे) आणि मोबाईल क्रमांक, तसेच आपली तक्रार किंवा शंका यांचा थोडक्यात तपशील नमूद करावा असे त्यांना कळवण्यात येत आहे..
जलद संवाद आणि तक्रारींचे प्रभावी निवारण करण्यासाठी, गोव्यातील ईपीएफओ प्रादेशिक कार्यालयाने राज्यातील सर्व सदस्य आणि नियोक्त्यांना अद्ययावत व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
हा उपक्रम पारदर्शक, नागरिक-केंद्रित आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवा पुरवण्याच्या ईपीएफओ च्या निरंतर प्रयत्नांचा एक भाग असून त्यामुळे सदस्यांना सामाजिक सुरक्षेचे लाभ अधिक सहजपणे उपलब्ध होत आहेत.

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 2290156)
अभ्यागत कक्ष : 30