ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
प्लास्टिकच्या डब्यांसाठी मानकांचा मसुदा या विषयावर बीआयएस मुंबईतर्फे 'मानक मंथन'चे आयोजन
चर्चेत प्लास्टिकच्या डब्यांची गुणवत्ता, सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या गरजा हे मुद्दे केंद्रस्थानी
Posted On:
27 JUL 2026 7:14PM by PIB Mumbai
मुंबई, 27 जुलै 2026
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) च्या मुंबई शाखा कार्यालयाच्या वतीने 24 जुलै 2026 रोजी पवई येथील त्यांच्या कार्यालयात 'मानक मंथन'चे हायब्रिड पद्धतीने (ऑफलाइन आणि ऑनलाइन) आयोजन करण्यात आले होते.
'मायक्रोवेव्हमध्ये वापरण्यायोग्य प्लास्टिकची भांडी – विनिर्देश' तसेच 'शिशूंसाठी प्लास्टिकची खाण्या-पिण्याची भांडी, पूरक साधने आणि कटलरी – विनिर्देश' या दोन भारतीय मानकांच्या मसुद्यांबाबत संबंधित घटकांशी चर्चा आणि सल्लामसलत करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 'वैज्ञानिक ई/संचालक' महेंद्र सिंग जाखड यांनी तांत्रिक सत्रे घेतली; त्यांनी या उत्पादनांची गुणवत्ता, सुरक्षा आणि कार्यक्षमता यांबाबतच्या मानकांच्या मसुद्यातील तरतुदींचे सविस्तर विवेचन केले.

या कार्यक्रमात निर्मिती क्षेत्रातील उद्योग, औद्योगिक संघटना, चाचणी प्रयोगशाळा आणि इतर संबंधित घटकांच्या प्रतिनिधींचा प्रत्यक्ष (ऑफलाइन) आणि ऑनलाइन अशा दोन्ही स्वरुपात सहभाग होता. चर्चेमध्ये, सहभागींनी मानकीकरण प्रक्रियेत ज्या गोष्टी विचारात घेता येऊ शकतील अशी मसुदा मानकांबाबत आपली तांत्रिक निरीक्षणे, सूचना आणि अभिप्राय सामायिक केले. तसेच, यामध्ये परस्परसंवादी प्रश्नोत्तरांचे सत्रही आयोजित करण्यात आले होते, त्यामुळे सहभागींना मसुदा मानकांबाबत शंकानिरसन करून घेण्याची आणि मसुद्यात समाविष्ट करण्याजोग्या तरतुदींची शिफारस करण्याची संधी मिळाली.
'मानक मंथन' हे विविध भागधारकांशी सल्लामसलत आणि तांत्रिक दृष्टिकोनांची देवाणघेवाण करण्याचे एक व्यासपीठ ठरले त्याबरोबरच सहभागात्मक मानकीकरण प्रक्रियेद्वारे मजबूत, कालसुसंगत आणि प्रभावी भारतीय मानके विकसित करण्याचे बीआयएसचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या उपक्रमाने हातभार लावला.
सुषमा काणे/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2290121)
अभ्यागत कक्ष : 54