ऊर्जा मंत्रालय
एनटीपीसीने आर्थिक वर्ष 27च्या पहिल्या तिमाहीतील दमदार आर्थिक कामगिरीची केली घोषणा: स्वतंत्र करपश्चात नफ्यात 12%ची वाढ तर समूहातील करपश्चात नफ्यात 13%ची वाढ
प्रविष्टि तिथि:
24 JUL 2026 10:09PM by PIB Mumbai
मुंबई 24 जुलै 2026
एनटीपीसी या देशाच्या वीज क्षेत्रातील सर्वात मोठ्या एकात्मिक उपक्रमाने दिनांक 30.06.2026 मध्ये संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित आर्थिक निष्कर्ष जाहीर केले असून, त्यात परिचालनात्मक सुधारणा तसेच अखंडित वाढीमुळे साधलेली सशक्त सर्वसमावेशक कामगिरी नोंदवली आहे.
स्वतंत्रपणे, एनटीपीसीने आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीत, आर्थिक वर्ष 26 मधील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 3%ची वाढ नोंदवत, 44,512 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा करपश्चात नफा (पीएटी) 4,775 कोटी रुपये होता तो आता आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीत 5,342 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. पीएटी मध्ये झालेली ही वाढ मुख्यतः वीज निर्मिती क्षमतेत पडलेली भर आणि परिचालनात्मक कार्यक्षमता यांच्यामुळे साध्य झाली आहे.
एकत्रित आधारावर, एनटीपीसी समूहाचा आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीत असलेला 6,108 कोटी रुपयांचा पीएटी 13%ची वाढ दर्शवत, आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीत 6,896 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. समूहातील कंपन्यांच्या नफ्यात 62% वाढ होऊन आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीत असलेला 1,131 कोटी रुपये नफा, आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीत वाढून 1,832 रुपये झाल्यामुळे या मजबूत कामगिरीला आणखी बळकटी मिळाली. एनटीपीसीची कोळशावर चालणारी वीजकेंद्रे परिचालन कार्यक्षमतेच्या बाबतीत उद्योगांतील नवे मापदंड स्थापित करणे सुरु ठेवत आहेत. एनटीपीसीच्या कोळशावर चालणाऱ्या केंद्रांनी आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीत 76.71% चा प्लांट लोड फॅक्टर (पीएलएफ) साध्य केला असून उर्वरित भारताच्या 70.32% पीएलएफ पेक्षा त्यांनी लक्षणीयरित्या चांगली कामगिरी केली आहे.
सातत्यपूर्ण परिचालन उत्कृष्टता तसेच विकासाच्या वैविध्यपूर्ण धोरणांच्या बळावर हे निष्कर्ष देशाच्या उर्जा क्षेत्रात एनटीपीसीचे आघाडीचे स्थान अधिक बळकट करतात.

***
सुषमा काणे/संजना चिटणीस/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2289258)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English