पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रातील गुलदार अंडरवॉटर संग्रहालय प्रकल्प मार्च 2028 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा


या प्रकल्पातून महाराष्ट्रात 800 प्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होण्यासोबत सागरी पर्यटनाला चालना मिळणार

प्रविष्टि तिथि: 21 JUL 2026 9:32PM by PIB Mumbai

मुंबई,21 जुलै 2026

पर्यटन मंत्रालयाने भांडवली गुंतवणूकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत,महाराष्ट्रात सेवेतून निवृत्त नौका 'गुलदार या पाण्याखालील संग्रहालय, कृत्रिम रीफ आणि पाणबुडी पर्यटन, सिंधुदुर्ग' या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.या प्रकल्पाला 2024–25 या आर्थिक वर्षात एकूण 46.91 कोटी रुपयांच्या तरतुदीसह मान्यता देण्यात आली.

महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या ताज्या प्रगती अहवालानुसार, हा प्रकल्प 31 मार्च 2028 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारने सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार (डीपीआर), प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 10 वर्षांच्या कालावधीत यातून सुमारे 800 प्रत्यक्ष नोकऱ्या  निर्माण होण्याचा अंदाज आहे.

पर्यटन मंत्रालय वेळोवेळी विविध स्तरांवर राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनांसोबत आढावा बैठका घेऊन आपल्या सुरू असलेल्या प्रकल्पांच्या प्रगतीवर नियमितपणे लक्ष ठेवते. या बैठकांदरम्यान, प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी सुकर करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना भेडसावणाऱ्या समस्या व अडथळ्यांवर चर्चा केली जाते आणि त्यांचे निराकरण केले जाते.

ही माहिती केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.

 

  सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

निलीमा चितळे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर

 


(रिलीज़ आईडी: 2287472) आगंतुक पटल : 29
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English