माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालय(पीआयबी) मुंबईच्या वतीने कोल्हापूरमध्ये 'प्रादेशिक ओळखीकडून जागतिक संधीकडे'या विषयावर वार्तालाप या माध्यम परिषदेचे आयोजन


कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जस्मिन यांच्या हस्ते होणार 'वार्तालाप'चे उद्घाटन

Posted On: 20 JUL 2026 6:48PM by PIB Mumbai

कोल्हापूर/मुंबई,17 जुलै 2026

मुंबईचे पत्र सूचना कार्यालय (PIB), कोल्हापूर जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी 21 जुलै 2026 रोजी कोल्हापुरातल्या द पॅव्हेलियन हॉटेलमध्ये "प्रादेशिक ओळखीकडून जागतिक संधीकडे" या संकल्पनेवर आधारित 'वार्तालाप – माध्यम परिषद' आयोजित करणार आहे. या परिषदेचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन यांच्या हस्ते होणार आहे.

माध्यम व्यावसायिकांची क्षमता वाढवणे तसेच जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल, कौन्सिल ऑफ लेदर एक्स्पोर्ट्स आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण या तीन संस्थांद्वारे पुरवल्या जाणाऱ्या उपक्रम आणि संधींबद्दल जागरूकता निर्माण करणे, हा या परिषदेचा उद्देश आहे. या संस्थांच्या सत्रांद्वारे, 'वार्तालाप' परिषदेमध्ये कोल्हापूरची अद्वितीय शक्ती आणि वाढीची क्षमता दर्शविणाऱ्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

या चर्चासत्रांमध्ये या भागातल्या धातू हस्तकला क्षेत्रात असलेल्या निर्यातीच्या संधींवर प्रकाश टाकणारे "सीमापार दागिने: कोल्हापूरच्या धातू हस्तकलेला जागतिक बाजारपेठेशी जोडणे"; कोल्हापुरी चर्मोत्पादनांची जागतिक स्पर्धात्मकता वाढविण्यावर भर देणारे "जीआय टॅगच्या पलीकडे: कोल्हापुरी चामड्यासाठी जागतिक स्पर्धात्मकता निर्माण करणे"; आणि क्रीडा क्षेत्रातले कौशल्य ओळखून त्याला चालना देणारे "भविष्यातले चॅम्पियन्स: कोल्हापूरच्या क्रीडा क्षमतेला 'साई' कसा पाठिंबा देऊ शकते" अशा माहितीपूर्ण चर्चासत्रांचा समावेश असेल.

अचूक आणि जबाबदार वृत्तांकनासंबंधी संवादाला प्रोत्साहन देणे हा मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांतमधल्या व्यावसायिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेचा उद्देश आहे. या परिषदेत वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि भारत सरकारच्या योजनांचे लाभार्थी सहभागींशी संवाद साधतील, तसेच हा कार्यक्रम पत्रकारांमध्ये संपर्क वाढवणे, ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता बांधणीच्या संधी उपलब्ध करेल.

 

शैलेश पाटील/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

  सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2286747) अभ्यागत कक्ष : 54
Read this releasein: English