पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी चंदीगड येथे आरोग्यसेवा, शिक्षण आणि रस्ते पायाभूत सुविधांशी संबंधित विकासकामांच्या उद्घाटन आणि पायाभरणी समारंभातली क्षणचित्रे केली सामायिक

प्रविष्टि तिथि: 17 JUL 2026 8:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,17 जुलै 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंदीगडमधील विकासकामांच्या उद्घाटन आणि पायाभरणी समारंभातली  काही क्षणचित्रे समाजमाध्यमावर सामायिक केली आहेत. देशाच्या सुनियोजित प्रगतीचे आदर्श उदाहरण म्हणून या शहराला अद्वितीय स्थान असल्याचे अधोरेखित करत, उत्तम जीवनशैली आणि सुलभ जीवनमानासाठी या शहराची ख्याती असल्याचे त्यांनी नमूद केले. या भागावर 'माता चंडी'ची दैवी कृपादृष्टी असल्याचा उल्लेख करत त्यांनी शहराच्या निरंतर आणि रचनात्मक विकासासाठी प्रशासन दृढपणे कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.

'एक्स' या समाजमाध्यमावर पोस्टच्या माध्यमातून झलक सादर करताना मोदी म्हणतात:

वैद्यकीय सुविधांसोबतच अधिक चांगल्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत चंदीगडच्या जनतेमध्ये असलेली सजगता उत्साहवर्धक आहे.  

चंडीगडच्या रहिवाशांनी स्वच्छतेच्या बाबतीत एक नवी जाणीव जागी केली आहे. याकरिता मी माझ्या येथील आप्तजनांचे विशेष अभिनंदन करतो. स्वच्छतेच्या अशा स्वरुपाच्या मोहिमा देशासाठी खूप उपयोगी ठरत आहेत.    

गेल्या 12 वर्षांमध्ये आमच्या सरकारने आरोग्य सेवांच्या क्षेत्रात देशाचे सामर्थ्य वाढवले आहे , त्यामुळे आज लोकांना उपचारांच्या अधिक चांगल्या सुविधा मिळत आहेत. भारत वैद्यकीय पर्यटनासाठी महत्त्वाचे ठिकाण बनत आहे, हा देखील आपल्या प्रयत्नांचा एक मोठा परिणाम आहे.

केवळ आजारांवरील उपचारच नाही, तर प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवरही आमचा कायम भर राहिला आहे. याचा आपल्या माता-भगिनी आणि गरीब बंधु-भगिनींबरोबरच मध्यमवर्गीयांनाही लाभ होत आहे.

निलीमा चितळे/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

 

   सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2285950) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam