दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून सिंधुदुर्ग जिल्हा आणि पुणे ते सिंधुदुर्ग दरम्यान महामार्गावरील 'महाराष्ट्र एलएसए'मध्ये ड्राईव्ह टेस्ट अंतर्गत मोबाईल नेटवर्क गुणवत्तेचे मूल्यांकन
प्रविष्टि तिथि:
16 JUL 2026 2:10PM by PIB Mumbai
ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सर्वसामान्य दूरसंचार ग्राहकांच्या माहितीसाठी 'महाराष्ट्र एलएसए' (Licensed Service Area) अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एप्रिल 2026 मध्ये घेतलेल्या स्वतंत्र ड्राईव्ह टेस्टचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. दूरसंचार सेवा पुरवठादारांद्वारे पुरवल्या जाणाऱ्या मोबाईल नेटवर्क सेवांच्या (व्हॉईस आणि डेटा दोन्ही) वास्तविक वेळेतील गुणवत्तेचे मूल्यांकन आणि पडताळणी करणे हा या ड्राईव्ह टेस्टचा मुख्य उद्देश आहे.या ड्राईव्ह टेस्टदरम्यान, ट्रायने कव्हरेज , कॉल ड्रॉप रेट , कॉल सेटअप सक्सेस रेट , डेटा डाऊनलोड आणि अपलोड थ्रुपुट यांसारख्या सेवा गुणवत्तेच्या प्रमुख मानकांच्या आधारे सेवा पुरवठादारांच्या कामगिरीची नोंद केली आहे. ग्राहकांना माहिती देणे आणि सेवा पुरवठादारांना त्यांच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यास प्रोत्साहित करणे हा यामागील हेतू असून त्यासाठी ही माहिती जाहीर करण्यात आली.
शहर, हॉटस्पॉट, सार्वजनिक वाहतूक केंद्रे यांसारख्या विविध वापराच्या पर्यावरणांमध्ये सर्व सेवा पुरवठादारांच्या प्रत्यक्ष स्थानावरील नेटवर्कच्या गुणवत्तेची नोंदणी करण्यासाठी या स्वतंत्र ड्राईव्ह टेस्ट तयार केल्या आहेत. या चाचणीत सर्व सेवा पुरवठादारांच्या सिम कार्ड्सचा वापर करून 2G, 3G, 4G आणि 5G नेटवर्कवर लाईव्ह डेटा आणि व्हॉईस सेशन्स स्थापित केले जातात. यासाठी एकापेक्षा जास्त प्रगत टेस्ट हँडसेट्सचा वापर केला जातो आणि प्रगत सॉफ्टवेअर सिस्टम्सद्वारे या सेशन्सचे रिअल-टाइममध्ये निरीक्षण व विश्लेषण केले जाते.
ट्रायने आपल्या नियुक्त एजन्सीद्वारे 14 एप्रिल 2026 ते 17 एप्रिल 2026 या कालावधीत महाराष्ट्र एलएसए मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यात 451.7 किमीची सिटी ड्राईव्ह , 13 हॉटस्पॉट ठिकाणे, 8.5 किमीची वॉक टेस्ट (पायी चाचणी) आणि 567.3 किमी अंतराच्या महामार्गावर ड्राईव्ह टेस्ट घेतली. या चाचण्या ट्रायच्या प्रादेशिक कार्यालय, बेंगळुरूच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आल्या. ड्राईव्ह टेस्टच्या अहवालात सादर केलेली निरीक्षणे ही चाचणीच्या दिवशी आणि वेळेत त्या मार्गावरील सेवा पुरवठादारांची कामगिरी दर्शवतात.
ड्राईव्ह टेस्ट मार्गाचा नकाशा : खालील नकाशामधील सूचीनुसार सिटी ड्राईव्ह , इंटर-ऑपरेटर कॉलिंग, हॉटस्पॉट्स आणि वॉक टेस्ट दर्शवणाऱ्या ड्राईव्ह टेस्ट मार्गांचे एकंदर परिदृश्य पाहता येते: -

मूल्यांकनाचे प्रमुख निकष
अ. कव्हरेज मधील त्रुटी :
ब. व्हॉईस सेवा :
क. कॉल सायलन्सची प्रकरणे
ड. डेटा सेवा:
मुख्य निकषांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्कच्या एकूण कामगिरीचा सारांश खालीलप्रमाणे आहे: -
1. सिंधुदुर्ग जिल्हा
कव्हरेजमधील त्रुटी, ड्रॉप झालेले कॉल्स, कॉल सायलेन्स होण्याची उदाहरणे, डेटा डाउनलोड आणि अपलोड थ्रुपुट, डेटा अपलोड परफॉर्मन्स याबाबतचे तपशील नकाशात दिले आहेत.
2. महामार्गावरील प्रवास - पुणे ते पणजी
कव्हरेजमधील त्रुटी, ड्रॉप झालेले कॉल्स, कॉल सायलेन्स होण्याची उदाहरणे, डेटा डाउनलोड आणि अपलोड थ्रुपुट, डेटा अपलोड परफॉर्मन्स याबाबतचे तपशील नकाशात दिले आहेत.
आयडीटी दरम्यानच्या ड्राईव्ह टेस्ट मार्ग आणि प्रवासाचे क्षेत्र याचे तपशील पुढील प्रमाणे:
a. शहर - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, देवगड, वडदे, कसाळ, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, तारकर्ली, मालवण आणि आचरा हा प्रदेश.
b.महामार्ग - पुणे ते पणजी पिरंगुट, ताम्हिणी, माणगाव, लोणेरे, पोलादपूर, खेड, तुरळ, संगमेश्वर, राजापूर, तळेरे, कुडाळ आणि गोवा दाबोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रदेश.
c. हॉटस्पॉट - स्थिर स्थितीत नेटवर्क मिळणारी हॉटस्पॉट ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत: चिवला बीच आणि रॉक गार्डन, देवबाग बीच, देवगड बस स्टँड आणि बीच परिसर, कणकवली बस स्टँड आणि मार्केट परिसर, कणकवली कॉलेज रोड ते कोर्ट रोड ते टिळक चौक लूप, कुणकेश्वर मंदिर परिसर, मालवण मार्केट परिसर, मिठबाव बीच, ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सावंतवाडी मार्केट परिसर, सिंधुदुर्ग किल्ला (मालवण), तारकर्ली बीच आणि वेंगुर्ला बीच आणि जेट्टी परिसर.
d. वॉक टेस्ट - 16 आणि 17 एप्रिल 2026 रोजी घेण्यात आलेल्या वॉक टेस्टमध्ये कुडाळ एमआयडीसी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचा लूप, कुडाळ रेल्वे स्थानक परिसर, मालवण जेट्टी ते दांडी बीच रोड ते वायरी परिसर, सावंतवाडी तलावाच्या कडेचा रोड लूप आणि वेंगुर्ला मार्केटमधील अंतर्गत रस्ते ते कॅम्प एरिया लूप यांचा समावेश होता. गर्दीच्या रस्त्यांवर चालताना मोबाईल नेटवर्कच्या उपलब्धतेचे निरीक्षण करणे हे याचे उद्दिष्ट होते.
या आयडीटी अहवालाचे निष्कर्ष संबंधित दूरसंचार सेवा पुरवठादारांना (टीएसपी) त्यांच्या स्तरावर पुढील आवश्यक कारवाई करण्यासाठी कळवण्यात आले आहेत. आयडीटीचे सविस्तर अहवाल ट्रायच्या पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत: www.trai.gov.in
कोणत्याही स्पष्टीकरणासाठी अथवा अतिरिक्त माहितीसाठी, adv.bengaluru@trai.gov.in
येथे ईमेल द्वारे, अथवा ट्रायच्या बंगळूरू येथील प्रादेशिक कार्यालयाशी +91-80-22865004 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.
परिशिष्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
***
निलिमा चितळे/शैलेश पाटील/राजश्री आगाशे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2285391)
आगंतुक पटल : 18