ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय मानक ब्युरोकडून नागपुरात आयएसआय चिन्ह नसलेल्या हेल्मेटच्या विक्रीविरोधात शोध आणि जप्तीची कारवाई
प्रविष्टि तिथि:
15 JUL 2026 8:14PM by PIB Mumbai
नागपूर, 15 जुलै 2026
केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) नागपुरातील एका हेल्मेट विक्री केंद्रावर अनिवार्य बीआयएस मानांकन (आयएसआय चिन्ह) नसलेल्या दुचाकीस्वारांच्या हेल्मेटची विक्री केल्याप्रकरणी शोध आणि जप्तीची कारवाई केली आहे. ही कारवाई दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट (गुणवत्ता नियंत्रण) आदेश, 2020 तसेच भारतीय मानक ब्युरो अधिनियम, 2016 मधील तरतुदींच्या कथित उल्लंघनाप्रकरणी करण्यात आली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर 15 जुलै 2026 रोजी नागपुरातील कपिल नगर, नारी रिंग रोड येथील कल्पना कॉम्प्लेक्समधील डीजे हेल्मेट शॉप येथे ही कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान बीआयएसच्या अधिकाऱ्यांना अनिवार्य आयएसआय चिन्ह नसलेली 38 दुचाकी हेल्मेट आढळून आली. यामध्ये 'रिषभ' या ब्रँडची 27, 'एमएएस' या ब्रँडची 9, तसेच 'स्टॉर्म' आणि 'ओशन' या ब्रँडचे प्रत्येकी एक हेल्मेट समाविष्ट आहे.

PYO0.jpeg)
ही कारवाई दुचाकी हेल्मेट (गुणवत्ता नियंत्रण) आदेश, 2020 [एस.ओ. 4252 (ई), दिनांक 26 नोव्हेंबर 2020] तसेच भारतीय मानक ब्युरो अधिनियम, 2016 मधील कलम 17(1) आणि 17(3) अंतर्गत करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणारी ही हेल्मेट पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी पुरावा म्हणून जप्त करण्यात आली आहेत.
भारतीय मानक ब्युरो अधिनियम, 2016 मधील तरतुदींनुसार संबंधित दुकानाविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
ग्राहकांच्या हिताचे संरक्षण आणि राष्ट्रीय मानके व प्रमाणन व्यवस्थेची विश्वासार्हता कायम राखण्यासाठी बीआयएस कटिबद्ध असल्याचे ब्युरोने म्हटले आहे. अनिवार्य बीआयएस प्रमाणन असलेली उत्पादने खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी बीआयएस केअर ॲप किंवा बीआयएसच्या अधिकृत संकेतस्थळावर संबंधित परवान्याची सत्यता पडताळून पाहावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पीआयबी नागपूर | सौरभ खेकडे/धनंजय वानखेडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2285110)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English