ग्रामीण विकास मंत्रालय
'भारत टेक्स 2026'मध्ये ग्रामीण विकास मंत्रालयाकडून महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण उद्योग प्रदर्शित
प्रविष्टि तिथि:
15 JUL 2026 7:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जुलै 2026
ग्रामीण विकास मंत्रालय हे 'दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान' (DAY-NRLM) च्या माध्यमातून 'भारत टेक्स 2026' मध्ये सहभागी होत आहे. नवी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे 14 ते 17 जुलै 2026 या कालावधीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात, देशभरातील बचत गटांशी निगडित ग्रामीण महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योग आणि उत्पादने प्रदर्शित केली जात आहेत.

मंत्रालयाच्या या सहभागामुळे विविध राज्यांमधील 'लखपती दीदी' जागतिक वस्त्रोद्योग मंचावर एकत्र आल्या असून तिथे त्या अभ्यागत, खरेदीदार आणि उद्योगाशी संबंधित हितधारकांसमोर आपली उत्पादने व उद्योग सादर करत आहेत. शाश्वत उद्योग उभारणे, कौटुंबिक उत्पन्न वाढवणे आणि स्थानिक कौशल्ये व उत्पादने मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यात ग्रामीण महिलांची वाढती भूमिका या सहभागातून अधोरेखित होते.

ग्रामीण विकास मंत्रालयाच्या या प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव रोहित कन्सल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामीण विकास मंत्रालयाच्या 'ग्रामीण उपजीविका' विभागाच्या सहसचिव स्वाती शर्मा आणि 'DAY-NRLM' च्या संचालिका डॉ. मोलिश्री देखील उपस्थित होत्या. त्यांनी यात सहभागी झालेल्या 'लखपती दीदीं'शी संवाद साधला आणि देशभरातील महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांनी तयार केलेली आणि प्रदर्शनात मांडलेली विविध उत्पादने पाहिली.
DAY-NRLM ने देशभरातील 10 कोटींहून अधिक ग्रामीण महिलांना बचत गटांशी जोडले आहे. या व्यापक सामुदायिक संस्थात्मक जाळ्याच्या आधारे, 'लखपती दीदी' उपक्रम ग्रामीण महिलांना त्यांची उपजीविका बळकट करण्यास, उत्पन्न वाढवण्यास आणि शाश्वत उद्योग उभारण्यास सक्षम बनवत आहे. 3 कोटी 'लखपती दीदीं'चा टप्पा ओलांडल्यानंतर, सरकार आता 6 कोटी 'लखपती दीदी' तयार करण्याच्या दिशेने काम करत आहे.

'भारत टेक्स 2026 मधील मंत्रालयाचा सहभाग ग्रामीण महिला उद्योजिकांना त्यांची उत्पादने जागतिक व्यासपीठावर प्रदर्शित करण्याची, तसेच खरेदीदार व उद्योगातील हितधारकांशी संवाद साधून बाजारपेठेतील व्यापक संधी शोधण्याची संधी उपलब्ध करून देतो. हा उपक्रम महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण उपक्रम बळकट करणे, पारंपरिक कौशल्ये जपणे आणि ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांसाठी बाजारपेठेची पोहोच विस्तारण्याप्रती केंद्र सरकारच्या वचनबद्धता अधिक दृढ करतो.
माधुरी पांगे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2285092)
आगंतुक पटल : 10