वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
आर्थिक वर्ष 2026-27 मधील एप्रिल-जून दरम्यानची एकूण (वस्तू आणि सेवांची) निर्यात 232.73 अब्ज डॉलर्स होण्याचा अंदाज असून आर्थिक वर्ष 2025-26 मधील एप्रिल ते जून दरम्यानच्या 208.98 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 11.37% ची अंदाजित वाढ दर्शवते
प्रविष्टि तिथि:
13 JUL 2026 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जुलै 2026
जून 2026* मधील भारताची एकूण (व्यापाराच्या वस्तू आणि सेवा एकत्रितपणे) निर्यात 73.45 अब्ज डॉलर्स होण्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये जून 2025 च्या तुलनेत 9.48 टक्के सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे. जून 2026 मधील एकूण आयात (व्यापाराच्या वस्तू आणि सेवा एकत्रितपणे) 88.76 अब्ज डॉलर्स अंदाजित आहे, ज्यामध्ये जून 2025 च्या तुलनेत 26.85 टक्के सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे.
Table 1: Trade during June 2026*
|
|
|
June 2026
(US$ Billion)
|
June 2025
(US$ Billion)
|
|
Merchandise
|
Exports
|
40.41
|
34.98
|
|
Imports
|
70.84
|
54.08
|
|
Services*
|
Exports
|
33.03
|
32.11
|
|
Imports
|
17.92
|
15.90
|
|
Total Trade
(Merchandise +Services) *
|
Exports
|
73.45
|
67.09
|
|
Imports
|
88.76
|
69.98
|
|
Trade Balance
|
-15.32
|
-2.89
|
*टीप: सेवा क्षेत्रासाठी आरबीआयने जारी केलेली नवीनतम आकडेवारी मे 2026 ची आहे. जून 2026 ची आकडेवारी एक अंदाज आहे. (ii) आर्थिक वर्ष 2025-26 च्या एप्रिल ते जूनची आकडेवारी पेमेंट्स डेटाच्या त्रैमासिक शिलकीचा वापर करून यथानुपात तत्त्वावर सुधारित करण्यात आली आहे.
Fig 1: Total Trade during June 2026*

आर्थिक वर्ष 2026-27 मधील एप्रिल ते जून दरम्यानची भारताची एकूण निर्यात 232.73 अब्ज होण्याचा अंदाज असून त्यात 11.37 टक्के सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे. आर्थिक वर्ष 2026-27 मधील एप्रिल ते जून दरम्यानची एकूण आयात 270.15 अब्ज डॉलर्स होण्याचा अंदाज असून त्यात 17.55 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
Table 2: Trade during April-June 2026-27*
|
|
|
April-June 2026-27
(US$ Billion)
|
April-June 2025-26
(US$ Billion)
|
|
Merchandise
|
Exports
|
129.32
|
111.57
|
|
Imports
|
216.18
|
180.31
|
|
Services*
|
Exports
|
103.41
|
97.41
|
|
Imports
|
53.97
|
49.51
|
|
Total Trade
(Merchandise +Services) *
|
Exports
|
232.73
|
208.98
|
|
Imports
|
270.15
|
229.82
|
|
Trade Balance
|
-37.42
|
-20.85
|
Fig 2: Total Trade during April-June 2026-27*

वस्तू व्यापार
जून 2026 मध्ये व्यापारी वस्तूंची निर्यात 40.41 अब्ज डॉलर्स होती, जी जून 2025 मधील 34.98 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत अधिक आहे.
जून 2026 मध्ये वस्तूंची आयात 70.84 अब्ज डॉलर्स होती, जी जून 2025 मधील 54.08 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत अधिक आहे.

आर्थिक वर्ष 2026-27 मधील एप्रिल-जून दरम्यान वस्तूंची निर्यात 129.32 अब्ज डॉलर्स होती, जी आर्थिक वर्ष 2025-26 मधील एप्रिल-जून दरम्यानच्या 111.57 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत अधिक आहे.
आर्थिक वर्ष 2026-27 मधील एप्रिल-जून दरम्यान वस्तूंची आयात 216.18 अब्ज डॉलर्स होती, जी आर्थिक वर्ष 2025-26 मधील एप्रिल-जून दरम्यानच्या 180.31 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत अधिक आहे.
आर्थिक वर्ष 2026-27 मधील एप्रिल-जून दरम्यान वस्तू व्यापार तूट 86.86 अब्ज डॉलर्स होती, जी आर्थिक वर्ष 2025-26 मधील एप्रिल-जून दरम्यानच्या 68.75 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत अधिक आहे.

सेवा व्यापार
जून 2026 मधील सेवा निर्यातीचे अंदाजित मूल्य 33.03 अब्ज डॉलर्स आहे, जे जून 2025 मधील 32.11 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत अधिक आहे.
जून 2026 मधील सेवा आयातीचे अंदाजित मूल्य 17.92 अब्ज डॉलर्स आहे, जे जून 2025 मधील 15.90 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत अधिक आहे.
आर्थिक वर्ष 2026-27 मधील एप्रिल-जून दरम्यान सेवा निर्यातीचे अंदाजित मूल्य 103.41 अब्ज डॉलर्स आहे, जे आर्थिक वर्ष 2025-26 मधील एप्रिल-जून दरम्यानच्या 97.41 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत अधिक आहे.
आर्थिक वर्ष 2026-27 मधील एप्रिल-जून दरम्यान सेवा आयातीचे अंदाजित मूल्य 53.97 अब्ज डॉलर्स आहे, जे आर्थिक वर्ष 2025-26 मधील एप्रिल-जून दरम्यानच्या 49.51 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत अधिक आहे.
आर्थिक वर्ष 2026-27 मधील एप्रिल-जून दरम्यान सेवा व्यापार अधिशेष 49.43 अब्ज डॉलर्स अंदाजित आहे, जो आर्थिक वर्ष 2025-26 मधील एप्रिल-जून दरम्यानच्या 47.90 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत अधिक आहे.
* * *
निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2284279)
आगंतुक पटल : 11