युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

फिट इंडियाच्या 'संडेज ऑन सायकल' या उपक्रमांतर्गत आयोजित 'आषाढी पंढरपूर सायकल वारी 2026 मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील 4000 हून अधिक सायकलस्वार झाले सहभागी

प्रविष्टि तिथि: 13 JUL 2026 6:25PM by PIB Mumbai

मुंबई, 13 जुलै 2026

 

फिट इंडियाच्या 81 व्या पर्वातील वैशिष्ट्यपूर्ण अभियानाअंतर्गत 'संडेज ऑन सायकल' मोहिम, 'आषाढी- पंढरपूर सायकल वारी 2026 मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 4000 हून अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतला आहे. 'आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या,मुंबई प्रादेशिक केंद्रातर्फे रविवारी पंढरपूर शहरात या भव्य सायकल रॅलीच्या रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सायकल रॅलीला भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे (आयआरएस) यांच्या हस्ते औपचारिकपणे हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

आषाढी- पंढरपूर सायकल वारी असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या उपक्रमात, शतकानुशतके चालत आलेल्या वारकरी परंपरेपासून प्रेरित होऊन एका अनोख्या उत्सवात सायकलस्वार, फिटनेसप्रेमी आणि विठ्ठल भक्त एकत्र आले.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 140 हून अधिक सायकलिंग क्लब मधील सदस्य सहभागी या सोहळ्यात सामील झाले आहेत, ज्यामुळे आषाढी वारीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सर्वात मोठ्या सायकलिंग मेळाव्यांपैकी हा एक ठरला.

'संडेज ऑन सायकल'च्या या पर्वाचा उद्देश नियमित शारीरिक हालचालींचे महत्त्व, वाहतुकीचे एक पर्यावरणपूरक साधन म्हणून सायकलिंग करणे, रस्ते सुरक्षा, पर्यावरण संवर्धन आणि सामुदायिक सहभाग यांना प्रोत्साहन देणे हा होता.तंदुरुस्ती, भक्ती आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उत्सव साजरा करणारी 'आषाढी -पंढरपूर सायकल वारी 2026 ही खेळ, तंदुरुस्ती आणि वारसा हे एकत्र येऊन निरोगी जीवनशैलीसाठी कसे प्रेरणा देऊ शकतात,पर्यावरणीय जबाबदारीला प्रोत्साहन देऊ शकतात आणि सामाजिक सलोखा मजबूत करू शकतात याचे एक महत्त्वपूर्ण उदाहरण आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2284237) आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English