पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली
Posted On:
28 JUN 2026 10:38AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. मोदी म्हणाले की, देशाच्या इतिहासातील एका अत्यंत कठीण कालखंडात पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारताच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण आणि शाश्वत योगदान दिले.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावर पोस्ट केले की,
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली. देशाच्या इतिहासातील एका अत्यंत कठीण कालखंडात त्यांनी भारताच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण आणि शाश्वत योगदान दिले. एक सक्षम प्रशासक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. ते एक विद्वान व्यक्तिमत्त्व होते आणि भारताच्या विविध संस्कृतींबाबतचे ज्ञान आणि समज त्यांना होती.
***
हर्षल अकुडे/राजेश शिरभाते/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2278567)
अभ्यागत कक्ष : 51
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada