अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या अध्यक्षतेखाली हज आढावा बैठक; हज-2026 चा आढावा आणि हज-2027 साठीचा आराखडा निश्चित


भारतीय हज मिशनला प्रथमच हज समन्वय आणि संवादातील उत्कृष्टतेसाठी दोन ‘लब्बैतुम’ पुरस्कार

प्रविष्टि तिथि: 18 JUN 2026 9:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2026

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने 18 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (डीएआयसी) येथे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या अध्यक्षतेखाली हज आढावा बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत हज-2026 च्या आयोजनाचा आढावा घेण्यात आला तसेच हज-2027 साठीच्या आराखड्यावर चर्चा करण्यात आली.

हज-2026 चे यशस्वी आयोजन झाल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. यंदा सुमारे 1.75 लाख भारतीय हज यात्रेकरूंनी हज यात्रा पूर्ण केली. या यशाचे श्रेय त्यांनी संबंधित सर्व मंत्रालये आणि विभाग, हज कमिटी ऑफ इंडिया, राज्य हज समित्या, सौदी अरेबियातील भारतीय हज मिशन आणि सौदी प्रशासन यांच्या समन्वित आणि समर्पित प्रयत्नांना दिले. सर्वांच्या सामूहिक योगदानामुळे यात्रा सुरळीत, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक पार पडल्याचे त्यांनी नमूद केले.

इतिहासात प्रथमच भारतीय हज मिशनला सौदी हज आणि उमराह मंत्रालयाकडून “बेस्ट हज कोऑर्डिनेशन अँड कम्युनिकेशन” या श्रेणीत दोन ‘लब्बैतुम’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. हज हंगामाच्या समारोपानिमित्त आयोजित ‘खितामहु मिस्क’ समारंभात हे पुरस्कार देण्यात आले. हज-2026 दरम्यान भारतीय यात्रेकरूंना अखंड सुविधा आणि कल्याणकारी सेवा पुरवल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला असून यात्रेकरू सेवेमधील उत्कृष्टतेविषयी भारताच्या सातत्यपूर्ण बांधिलकीची ही दखल आहे.

प्रदेशातील विद्यमान भू-राजकीय परिस्थिती असूनही संपूर्ण हज अभियान 400 उड्डाणांद्वारे यशस्वीरीत्या पार पडले. व्यापक वाहतूक व्यवस्था, सर्वसमावेशक वैद्यकीय सुविधा, वैद्यकीय आणि प्रशासकीय पथकांची नियुक्ती ज्यात मीना शिबिरामध्ये विशेष वैद्यकीय पथकाचाही समावेश होता.तसेच भारतीय हज मिशनकडून चोवीस तास सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले.

सुवर्णा बेडेकर/गजेंद्र देवडा /प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2274941) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi