विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीएसआयआर-एनआयएससीपीआर द्वारे 'कोहा' सॉफ्टवेअरच्या मूलभूत बाबींसंबंधीच्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन 

प्रविष्टि तिथि: 13 JUN 2026 1:37PM by PIB Mumbai

 

सीआयएसआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्चच्या वतीने 10 ते 12 जून 2026 या कालावधीत नवी दिल्लीतील 'सत्संग विहार' च्या प्रांगणात "कोहा सॉफ्टवेअरची मूलभूत माहिती" या विषयावर आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय प्रत्यक्ष (ऑफलाइन) कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. सहभागींची 'ओपन-सोर्स लायब्ररी ऑटोमेशन'मधील व्यावसायिक क्षमता बळकट करणे आणि त्यांना 'इंटिग्रेटेड लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टम्स' (आयएलएमसची) ची अंमलबजावणी तसेच व्यवस्थापन करण्याचे व्यावहारिक कौशल्य प्रशिक्षण देऊन सुसज्ज बनविण्याच्या उद्देशाने संस्थेच्या प्रशिक्षण विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असलेल्या 'कोहा' सॉफ्टवेअर या 'ओपन-सोर्स इंटिग्रेटेड लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टम' बाबतचे प्रशिक्षण देण्यावर कार्यक्रमात मुख्य भर देण्यात आला; या कार्यक्रमात देशभरातील शैक्षणिक, संशोधन आणि ग्रंथालय संस्थांमधील 33 जण सहभागी झाले होते.

मिताली भारती (नोडल पीआय), सलीम अन्सारी (सह-पीआय) आणि मुकेश ए. पुंड (मुख्य शास्त्रज्ञ व प्रमुख, प्रशिक्षण विभाग, सीएसआयआर-एनआयएससीपीआर) या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक होते. 10 जून 2026 रोजी झालेल्या उद्घाटन सत्रात, मिताली भारती यांनी सहभागींचे स्वागत करून त्यांना या कार्यक्रमाच्या एकंदर स्वरुपाची माहिती दिली, आणि सध्या उदयास येत असलेल्या डिजिटल ग्रंथालय तंत्रज्ञानामध्ये कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. मुकेश ए. पुंड यांनी प्रशिक्षणाची उद्दिष्टे विशद केली; तसेच त्यांनी ग्रंथालय स्वयंचलन कौशल्यांची गरज वाढत असल्याचेही स्पष्ट करत 'कोहा' सारख्या प्लॅटफॉर्म्समुळे कार्यक्षमता आणि माहिती संसाधनांची उपलब्धता वाढत आहे यावरही प्रकाश टाकला. सीएसआयआर-एनआयएससीपीआर मुख्य शास्त्रज्ञ. सी.बी. सिंग यांनी ग्रंथालय स्वयंचलन आणि ज्ञान व्यवस्थापनाला चालना देण्यात 'ओपन-सोर्स' तंत्रज्ञान व 'कोहा' यांच्या भूमिकेबाबत आपले विचार मांडले.

या तीन दिवसांच्या कालावधीत, सहभागींना ओपन-सोर्स सॉफ्टवेअरची मूलतत्त्वे, कोहाची रचना आणि वैशिष्ट्ये, लिनक्स इन्स्टॉलेशन, कोहा डिप्लॉयमेंट, प्रशासन, कॅटलॉग व्यवस्थापन, वाचक व्यवस्थापन आणि वितरण, आणि अहवाल निर्मिती या विषयांवर सखोल सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. प्रात्यक्षिक सराव आणि संवादात्मक सत्रांच्या माध्यमातून, सहभागींनी कोहा कॉन्फिगर करणे, ग्रंथसूची नोंदींचे व्यवस्थापन करणे, वितरण कार्यप्रवाह हाताळणे आणि सानुकूलित अहवाल तयार करणे या कामांचा अनुभव मिळवला.

12 जून 2026 रोजी समारोपाच्या सत्राने या कार्यक्रमाची सांगता झाली; या सत्रात सीएसआयआर-एनआयएससीपीआर’चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार यांनी उपस्थितांना संबोधित केले तसेच त्यांनी सहभागींशी संवादही साधला. ज्ञान व्यवस्थापनाला चालना देण्यात डिजिटल ग्रंथालय प्रणाली आणि 'मुक्त-स्रोत' उपाययोजनांचे वाढते महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

***

माधुरी पांगे/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2272483) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil