जलशक्ती मंत्रालय
विश्वास, विकास आणि जनकल्याणाची 12 वर्षे: केंद्रीय मंत्री गोव्यात स्वच्छता आणि हरित उपक्रमात झाले सहभागी
ताळगाव येथे स्वच्छता मोहिमेत आणि राष्ट्रीय जलक्रीडा संस्थेत वृक्षारोपणात नोंदविला सहभाग; प्रशिक्षण आणि बचाव सुविधांचा घेतला आढावा
प्रविष्टि तिथि:
11 JUN 2026 10:07PM by PIB Mumbai
गोवा, 11 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली '12 साल – विश्वास के, विकास के, जन-कल्याण के' या देशव्यापी उत्सवाचा एक भाग म्हणून केंद्रीय रेल्वे आणि जलशक्ती राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांनी आज गोव्याला भेट दिली आणि स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व कौशल्य विकास यांप्रति सरकारची वचनबद्धता अधोरेखित करणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.
मंत्र्यांनी ताळगाव येथे स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन आपल्या दौऱ्याची सुरुवात केली आणि स्वच्छ व शाश्वत परिसर राखण्याप्रती सामूहिक जबाबदारीच्या संदेशाला अधिक दृढ केले.

या उपक्रमात स्थानिक प्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
त्यानंतर मंत्र्यांनी राष्ट्रीय जलक्रीडा संस्थेने (एनआयडब्ल्यूएस) त्यांच्या आवारात आयोजित केलेल्या वृक्षारोपण मोहिमेत भाग घेतला. या वृक्षारोपण उपक्रमाने पर्यावरण संरक्षण आणि हरित भविष्याला चालना देण्यावर सरकारचे असलेले सातत्यपूर्ण लक्ष अधोरेखित केले.
या भेटीदरम्यान, एनआयडब्ल्यूएसच्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना संस्थेचे उपक्रम, चालू असलेले प्रकल्प, प्रशिक्षण कार्यक्रम आणि देशभरात जलक्रीडांना प्रोत्साहन देण्यासाठी व जलसुरक्षा कौशल्ये वाढवण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली. कुशल मनुष्यबळ विकसित करण्याच्या आणि पाण्यावर आधारित मनोरंजक उपक्रम व सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांचे मंत्र्यांनी कौतुक केले.

मंत्र्यांनी संस्थेच्या जलतरण तलावातील बचाव आणि जीवरक्षक प्रात्यक्षिकांचा आढावा घेतला आणि प्रशिक्षणार्थींकडून केल्या जात असलेल्या व्यावहारिक प्रशिक्षण सरावाचे निरीक्षण केले. जलसुरक्षा आणि बचाव सज्जता बळकट करण्याच्या दिशेने दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी संस्थेची प्रशंसा केली.
याप्रसंगी आमदार केदार नाईक, एनआयडब्ल्यूएसचे नोडल अधिकारी डॉ. पवन गुप्ता, वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या भेटीतून सर्वसमावेशक विकास, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या लोककेंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास निर्माण करण्याचा सरकारचा बारा वर्षांच्या प्रवास प्रतिबिंबित झाला.

8WIU.jpeg)

* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(रिलीज़ आईडी: 2271933)
आगंतुक पटल : 32
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English