आदिवासी विकास मंत्रालय
एन ई एस टी एस ने एकलव्य माॅडेल निवासी शाळांमध्ये ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअर प्रोग्राम लागू करण्यासाठी लर्निंग लिंक्स फाउंडेशनसोबत केला सामंजस्य करार
प्रविष्टि तिथि:
05 JUN 2026 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2026
भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीतील एक स्वायत्त संस्था असलेल्या नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्सने (एन ई एस टी एस) देशभरातील एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअर कार्यक्रम राबवण्यासाठी लर्निंग लिंक्स फाउंडेशनसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
एन ई एस टी एस आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशन यांच्यातील भागीदारीने, ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमुळे, 2022 पासून आजपर्यंत इयत्ता सहावी ते नववीच्या अंदाजे 80,000 विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. या सहकार्याच्या यशावर आधारित या सामंजस्य कराराचे नूतनीकरण 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2028 या कालावधीसाठी करण्यात आले आहे. भारतातील ॲमेझॉनच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी म्हणजेच सीएसआर उपक्रमाद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांमधील डिजिटल आणि तांत्रिक शिक्षण मजबूत करण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
या सहकार्याअंतर्गत, हा कार्यक्रम 443 एकलव्य माॅडेल निवासी शाळांपर्यंत विस्तारला जाईल. उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये पायाभूत व प्रगत कौशल्ये निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून इयत्ता सहावी ते नववी मधील 2 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवर याचा सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे.
अभ्यासक्रमात एआयचे एकत्रीकरण करण्यापलीकडे, वंचित शाळांमधील डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ॲमेझॉन एन ई एस टी एससोबत सहकार्य करत आहे. या उपक्रमांतर्गत, शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये एकलव्य माॅडेल निवासी शाळांमधील शिक्षकांना 284 हून अद्ययावत लॅपटॉप प्रदान करण्यात आले. याच प्रयत्नांना पुढे नेत, शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये 238 एकलव्य शाळांना 900 हून अधिक डिजिटल उपकरणे प्रदान केली जातील, ज्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान-सक्षम शिक्षणाची संधी उपलब्ध होईल.
एएफई उपक्रमामध्ये तीन प्रमुख घटकांचा समावेश असेल:
- संगणकशास्त्राची मूलतत्त्वे: कोडिंग, संगणकीय विचार आणि समस्या-निवारण कौशल्यांचा परिचय
- कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साक्षरता: अनुभवात्मक आणि प्रकल्प-आधारित शिक्षणाद्वारे एआय संकल्पनांबद्दल जागरूकता निर्माण करणे
- करिअरची ओळख: आभासी उद्योग अनुभव आणि करिअर परिचयाद्वारे तंत्रज्ञान-आधारित करिअर मार्गांची माहिती देणे
* * *
राधिका अघोर/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2269416)
आगंतुक पटल : 17