अर्थ मंत्रालय
आयकर विभाग, पुणे मार्फत महाराष्ट्र विधानपरिषद द्विवार्षिक निवडणूक दरम्यान पैशाच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी 24x7 नियंत्रण कक्ष सुरू
नागरिक फोन क्रमांक, व्हॉट्सॲप/मेसेज किंवा ई-मेलद्वारे माहिती देऊ शकतात
प्रविष्टि तिथि:
02 JUN 2026 5:57PM by PIB Mumbai
पुणे, 2 जून 2026
महाराष्ट्रातील विधानपरिषदेची द्विवार्षिक निवडणूक दरम्यान पैशाच्या गैर वापराला आळा घालण्यासाठी आयकर विभाग कटिबद्ध आहे. मुक्त, निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने तसेच निवडणूक प्रक्रियेची शुचिता राखण्यासाठी आयकर विभाग, पुणे यांनी खालील स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ साठी 24x7 कार्यरत असा निवडणूक निरीक्षण नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे:
पुणे, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, सांगली–सातारा, रायगढ़-रत्नागिरी-सिंधुदुर्ग.
आदर्श आचारसंहिता (Model Code of Conduct – MCC) लागू असेपर्यंत हा नियंत्रण कक्ष कार्यरत राहील. निवडणूक प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रोख रकमेबाबत व मौल्यवान वस्तूंविषयी माहिती देण्यासाठी नागरिक व राज्यातील जनतेस जागरूक करण्याचा यामागील उद्देश आहे. खालील व्हॉट्सॲप/मेसेज/मोबाईल क्रमांक व ई-मेलद्वारे नियंत्रण कक्षास माहिती देता येईल:
व्हॉट्सॲप क्रमांक: 9404569476
ई-मेल आयडी: pune.pdit.inv@incometax.gov.in
पत्ता:
नियंत्रण कक्ष, खोली क्रमांक 826,
8 वा मजला, आयकर सदन, बोधी टॉवर,
सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, पुणे – 411037.
* * *
पीआयबी पुणे | हर्षल आकुडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2268059)
आगंतुक पटल : 53
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English