वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताच्या सागरी खाद्यपदार्थांच्या निर्यातीने 73,890 कोटी रूपयांचा गाठला विक्रमी उच्चांक
गोठवलेल्या कोळंबीमुळे भारताच्या सागरी खाद्यपदार्थांच्या निर्यातीचा विक्रम; अमेरिका आणि चीन या प्रमुख बाजारपेठा कायम
प्रविष्टि तिथि:
01 JUN 2026 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2026
एमपीईडीए म्हणजेच सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष पी. जवाहर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान भारताने 19,72,018 मेट्रिक टन सागरी खाद्यपदार्थांची निर्यात केली. या निर्यातीचे मूल्य 73,890.46 कोटी रूपये (8.46 अब्ज अमेरिकन डॉलर्स) इतके होते. जागतिक बाजारपेठेतील आव्हानात्मक परिस्थिती असूनही, निर्यातीचे प्रमाण आणि मूल्य या दोन्ही बाबतीत भारताने आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम नोंदवला आहे.
या वर्षातही अमेरिका आणि चीन हे दोन देश भारतीय सागरी खाद्यपदार्थांचे प्रमुख आयातदार देश म्हणून कायम राहिले.
यामध्ये गोठवलेली कोळंबी हे निर्यातीचे प्रमुख खाद्य ठरले असून, तिने 49,037.93 कोटी रूपयांचे (5,624.48 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) योगदान दिले. एकूण निर्यातीच्या प्रमाणात तिचा वाटा 40.19 टक्के होता, तर अमेरिकन डॉलर्सच्या संदर्भातील एकूण निर्यात उत्पन्नामध्ये तिचे योगदान 66.52 टक्के राहिले.
गोठवलेला मासा हा निर्यातीचा दुसरा सर्वात मोठा सागरी खाद्यपदार्थ ठरला असून, त्यातून 5,658.37 कोटी रूपयांचे (643.70 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) उत्पन्न मिळाले. वाळवलेले सागरी खाद्यपदार्थ तिसऱ्या क्रमांकावर राहिले; त्यातून 5,079.09 कोटी रूपयांचे (577.44 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) उत्पन्न मिळाले आणि रुपयांच्या मूल्याच्या संदर्भात 78.05 टक्क्यांची सकारात्मक वाढ नोंदवली गेली.
गोठवलेल्या स्क्विडची निर्यात 1,02,060 मेट्रिक टनांपर्यंत पोहोचली असून, त्यातून 4,493.80 कोटी रूपयांचे ( 513.84 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) उत्पन्न मिळाले. गोठवलेल्या कटलफिशच्या निर्यातीतही प्रमाण आणि मूल्य या दोन्ही बाबतीत वाढ नोंदवली गेली; तिच्या प्रमाणात 13.32 टक्क्यांनी, तर डॉलर मूल्यामध्ये 16.25 टक्क्यांनी वाढ झाली. गोठवलेल्या कटलफिशची एकूण निर्यात 67,157 मेट्रिक टन इतकी झाली असून, तिचे मूल्य 331.96 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके होते. शीतलीकृत उत्पादनांच्या निर्यातीतून 622.31 कोटी रूपये (71.27 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) इतका महसूल प्राप्त झाला; तर जिवंत उत्पादनांच्या निर्यातीने डॉलर मूल्याच्या संदर्भात 11.46 टक्के वाढ नोंदवत, 62.43 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा टप्पा गाठला.
आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान, सागरी खाद्यपदार्थांच्या (सीफूड) निर्यात मालाची हाताळणी करणारी अव्वल तीन बंदरे, विशाखापट्टणम (वायझॅग), जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) आणि कोची ही होती.
* * *
राधिका अघोर/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2267733)
आगंतुक पटल : 93