संरक्षण मंत्रालय
वसंत सत्र 2026 - दीक्षांत संचलन
Posted On:
28 MAY 2026 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मे 2026
भारतीय नौदल अकादमी (आयएनए), एझिमाला येथे 28 मे 2026 रोजी भव्य पासिंग आऊट परेड अर्थात दीक्षांत संचलन सोहळा आयोजन करण्यात आला होता.
66 महिला प्रशिक्षणार्थींसह एकूण 311 प्रशिक्षणार्थींनी विशेष प्रावीण्यासह प्रशिक्षण पूर्ण केले, याबरोबरच त्यांचे प्राथमिक लष्करी प्रशिक्षण पूर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या या तुकडीमध्ये सेशेल्स, टांझानिया आणि व्हिएतनाम या तीन मित्र राष्ट्रांच्या सहा प्रशिक्षणार्थींचा समावेश होता, यापैकी दोन सेशेल्समधील महिला प्रशिक्षणार्थी होत्या. यामधून अकादमीचा विस्तारत असलेला आंतरराष्ट्रीय प्रभाव दिसून येतो.
दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस ऍडमिरल समीर सक्सेना यांनी दीक्षांत संचलनाचे निरीक्षण केले. आयएनएचे कमांडर व्हाईस ॲडमिरल मनीष चड्ढा यांनी या समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून दीक्षांत संचलनाचे निरीक्षण केले.
संचलनादरम्यान, प्रमुख अतिथींनी गुणवंत प्रशिक्षणार्थींना पुरस्कार आणि पदके प्रदान केली. 110 व्या भारतीय नौदल अकादमी अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मिडशिपमन कुलदीप सिंह यांना राष्ट्रपतींचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
भारतीय नौदल अकादमीतील प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल मुख्य अतिथींनी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले. त्यांनी प्रशिक्षक आणि प्रशिक्षण कर्मचाऱ्यांच्या समर्पणाची प्रशंसा केली, तसेच पालकांच्या खंबीर आणि अढळ पाठिंब्याचाही गौरव केला. त्यांनी प्रशिक्षणाच्या प्राथमिक टप्प्यावरच परदेशी प्रशिक्षणार्थींना सामावून घेण्याच्या महत्त्वावर भर दिला, यामुळे तरुण वयातच कायमस्वरूपी मैत्रीचे नाते निर्माण होते आणि आंतरराष्ट्रीय सागरी सहकार्य टिकवून ठेवण्यासाठी हे उत्तम संकेत आहेत.
संचलनानंतर, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, आयएनएचे कमांडर, पालक आणि इतर मान्यवरांनी उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींच्या खांद्यावर सब-लेफ्टनंट पदाच्या फिती (स्ट्राइप्स) लावल्या. एका कठोर प्रशिक्षण कार्यक्रमाची यशस्वी पूर्तता साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या, अभिमानाने भारावून गेलेल्या कुटुंबांशी त्यांनी संवाद साधला. नवनियुक्त अधिकारी आता त्यांची व्यावसायिक क्षमता अधिक विकसित करण्यासाठी भारतीय नौदलाच्या विविध नौदल प्रशिक्षण संस्था आणि आघाडीच्या युद्धनौकांवर रवाना होतील.
(3)93GJ.jpeg)
NSW1.jpeg)
Z9JS.jpeg)
HSO8.jpeg)
0JZM.jpeg)
* * *
सोनाली काकडे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2266423)
अभ्यागत कक्ष : 11