परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ईदच्या सुट्टीतील बदलामुळे 28 मे 2026 रोजीच्या नियोजित पारपत्र मुलाखती आता 27 मे रोजी होणार

Posted On: 25 MAY 2026 10:13PM by PIB Mumbai

पुणे, 25 मे 2026

सरकारने जारी केलेल्या सुधारित सुट्टीसंदर्भातील अधिसूचनेनुसार, ईद-उल-झुहा (बकरीद) निमित्त सुट्टी 27 मे 2026 ऐवजी 28 मे 2026 रोजी असेल. त्यानुसार, प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे अंतर्गत कार्यरत असलेली सर्व कार्यालये गुरुवार, 28 मे 2026 रोजी बंद राहतील. 28 मे 2026 रोजी नियोजित असलेल्या पासपोर्ट-संबंधित सर्व अपॉइंटमेंट्स एक दिवस आधी म्हणजेच 27 मे 2026 रोजी घेण्यात येतील.

अपॉइंटमेंट्स पुनर्निर्धारणाचा तपशील:

* जुनी तारीख: 28 मे 2026 (गुरुवार)

* नवीन तारीख: 27 मे 2026 (बुधवार)

ज्या अर्जदारांच्या अपॉइंटमेंट्स 28 मे 2026 रोजी नियोजित होत्या, त्यांना विनंती आहे, की त्यांनी 27 मे 2026 रोजी त्यांच्या नियोजित वेळेनुसार आपापल्या पीएसके/पीओपीएसके (PSK/POPSK) कार्यालयात भेट द्यावी. पुनर्निर्धारित अपॉइंटमेंट्स संदर्भात संबंधित अर्जदारांना एसएमएस द्वारेही सूचना पाठवल्या जातील.

ज्या अर्जदारांच्या 'चौकशी' अपॉइंटमेंट्स 28 मे 2026 रोजी नियोजित आहेत, त्यांना 27 मे 2026 रोजी पासपोर्ट भवन, बाणेर-पाषाण लिंक रोड, बाणेर, पुणे येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

कोणत्याही प्रश्नांसाठी किंवा मदतीसाठी, अर्जदार खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात:

* हेल्पलाइन क्रमांक: 020-27209999

* ईमेल: rpo.pune@cpo.gov.in

राधिका अघोर/पर्णिका हेदवकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2265210) अभ्यागत कक्ष : 70
Read this releasein: English