रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा घेतला आढावा
Posted On:
25 MAY 2026 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मे 2026
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची गुणवत्ता आणि देखरेखीच्या स्थितीसंदर्भात सविस्तर आढावा बैठका घेतल्या. या रस्त्यांबाबत प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या बैठका घेण्यात आल्या. केंद्रीय राज्यमंत्री अजय टमटा आणि हर्ष मल्होत्रा, एनएचएआय व एमओआरटीएच, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रकल्पांचे कंत्राटदार यांच्या उपस्थितीत या बैठका झाल्या.
आढावा घेताना गडकरी यांनी राजस्थानातील 10,064 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांची गुणवत्ता आणि देखभाल स्थितीचे मूल्यमापन केले, त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेशातील 1,947 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची गुणवत्ता आणि देखभालीच्या कामातील प्रगतीचा आढावा घेतला.
प्रकल्पांचे कार्य वेळेत होणे आणि दर्जांच्या मानकांची कठोरपणे अंमलबजावणी करणे त्याचप्रमाणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि आधुनिक बांधकाम पद्धतीचा वापर करुन विकास कामे शाश्वत आणि टिकाऊ करण्यावर गडकरी यांनी यावेळी भर दिला. महामार्गांचे जाळे हे संपर्क वाढवण्यासाठी आर्थिक प्रगतीला गती देण्यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक असून महत्त्वाच्या महामार्गांवरुन कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करता येणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
पावसाळ्यापूर्वीच्या तयारीसाठीची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, त्याचप्रमाणे सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था चोख असावी, असे निर्देशशी त्यांनी दिले. रस्त्यावरील उतारांच्या सुरक्षेचे उपाय करावेत. देखभालीसंदर्भात प्रतिबंधात्मक कामे करण्यात यावीत. त्याचप्रमाणे शीघ्र प्रतिसादाची यंत्रणा सुसज्ज ठेवावी. त्यामुळे वाहतुकीत व्यत्यय येणार नाही आणि रस्त्यांची सुरक्षितता राखून महामार्गाच्या मालमत्तेचा टिकाऊपणा वाढवता येईल.




राधिका अघोर/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2265102)
अभ्यागत कक्ष : 9