दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

टपाल खात्याकडून 3 जून रोजी विभाग स्तरावरील निवृत्तीवेतन अदालत आणि टपाल अदालतीचे आयोजन

Posted On: 22 MAY 2026 8:05PM by PIB Mumbai

गोवा, 22 मे 2026

 

गोवा टपाल विभाग, पणजी यांनी विभागीय स्तरावरील निवृत्तीवेतन अदालत तसेच डाक अदालतचे आयोजन केले आहे. या अदालती 3 जून 2026 रोजी अनुक्रमे सकाळी 11.00 आणि दुपारी 12.00 वाजता होणार आहेत. या अदालती   गोवा विभागीय टपाल कार्यालय, पणजी येथील वरिष्ठ अधीक्षकांच्या कार्यालयात होतील. निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारी आणि समस्या तसेच टपाल सेवेबाबत जनतेच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेण्यासाठी या अदालतींचे आयोजन करण्यात आले आहे.

मूळ तक्रार अर्ज केल्यापासून सहा आठवड्यांच्या आत ज्यांना अर्जाचे उत्तर मिळालेले नाही अशाच तक्रारदारांनी आपल्या तक्रारी किंवा समस्या या अदालतीत दाखल कराव्यात. सुरुवातीला ज्या अधिकाऱ्यांकडे मूळ तक्रार केली आहे त्या अधिकाऱ्याचे नाव आणि पद यांचा उल्लेख तक्रार अर्जामध्ये असावा. याशिवाय मूळ तक्रार कोणत्या तारखेला केली आहे त्याचाही उल्लेख करावा.

अर्जामध्ये मूळ कागदपत्रांची प्रत जोडणे बंधनकारक आहे. अदालतीमध्ये तक्रारअर्ज समक्ष दाखल करावेत किंवा ते वरिष्ठ अधीक्षक टपाल कार्यालय, गोवा विभाग, पणजी -403001 या पत्त्यावर पोस्टाने पाठवावे. हे अर्ज कार्यालयात 1 जून 2026 पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/विजया सहजराव/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 2264397) अभ्यागत कक्ष : 21
Read this releasein: English