अर्थ मंत्रालय
प्राप्तिकर विभागातर्फे मुंबईत मुलुंड येथे नवीन प्राप्तिकर कायदा, 2025 बाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
20 MAY 2026 6:36PM by PIB Mumbai
मुंबई, 20 मे 2026
नवीन प्राप्तिकर कायदा, 2025 मधील 1 एप्रिल 2026 पासून अंमलात आलेल्या ठळक वैशिष्ट्यांबद्दल जनजागृती करण्याच्या देशव्यापी उपक्रमाचा एक भाग म्हणून, प्राप्तिकर खात्याने 19 मे 2026 रोजी मुंबईतील मुलुंड येथे एक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन पीसीआयटी - 6 मुंबई यांनी केले. कार्यक्रमाला प्राप्तिकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच काही मान्यवर उपस्थित होते. यामध्ये सीए आर.सी. जैन, भारत विकास परिषद, पश्चिम विभाग संपर्क आणि सीए निमेश चोथानी, के.सी. विधी महाविद्यालय, सिद्धार्थ विधी महाविद्यालय आणि जी.एल. अडवाणी विधी महाविद्यालय येथील अतिथी प्राध्यापक यांचाही समावेश होता.
अतिरिक्त प्राप्तिकर आयुक्त, नुकुल अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर शिल्पा खणीकर आणि मानस साहू अतिरिक्त आयुक्त यांनी तांत्रिक सादरीकरण केले. यामध्ये त्यांनी प्राप्तिकर कायदा, 2025 च्या प्रमुख तरतुदी, अनुपालन आवश्यकतांमधील बदल आणि इतर महत्त्वाच्या पैलूंवर सविस्तर प्रकाश टाकला. सादरीकरणानंतर शुभम कुमार मीना एसीआयटी यांनी 'कर साथी’ या चॅटबॉटचे प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यक्रमामध्ये मुंबईच्या डॉ. माया माहेश्वरी बीजभाषण झाले. त्यानंतर प्रश्नोत्तराचे सत्र झाले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. समीक्षा म्हेत्रे आणि रूपल श्रीवास्तव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अतिरिक्त प्राप्तिकर आयुक्त सुनी मॅथ्यूज यांनी आभार मानले.

या कार्यक्रमात करदाते, सनदी लेखापाल, व्यापारी संघटना आणि नवी मुंबईतील तसेच बेलापूर, वाशी, खारघर आणि आसपासच्या परिसरातील आणि विविध व्यावसायिक समुदायांचे प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुवर्णा बेडेकर/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2263377)
अभ्यागत कक्ष : 17