अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबईच्या प्राप्तीकर विभागाने नवा प्राप्तिकर कायदा 2025 संदर्भात जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केला

Posted On: 20 MAY 2026 5:04PM by PIB Mumbai

मुंबई, 20 मे 2026

नवा प्राप्तीकर कायदा, 2025 आणि प्राप्तीकर नियम 2026 मधील तरतुदींबाबत मुंबईच्या प्राप्तिकर विभागाने मुंबईत आयबीजेए हाऊस येथे 19 मे 2026 रोजी जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राप्तीकर – मुंबई 5 च्या प्रधान  आयुक्त मोनिका खरे होत्या. या कार्यक्रमात मौल्यवान धातू आणि आभूषणे क्षेत्रातील करदाते,उद्योगक्षेत्रातील इंडिया बुलीयन आणि ज्वेलरी असोसिएशन लिमिटेड तसेच मुंबई  गोल्ड ज्वेलर्स  असोसिएशन आणि श्री मुंबादेवी दागिना बाजार असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आयबीजेए चे सचिव, सनदी लेखापाल  सुरेंद्र मेहता यांनीही आपले मौल्यवान विचार मांडले.

प्राप्तिकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभागींना नवीन आयकर कायदा, 2025 आणि आयकर नियम, 2026 यांची सुलभ भाषा, रचना आणि प्रमुख वैशिष्ट्यांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच, या कायद्यांचे अधिक चांगल्या प्रकारे आकलन होऊन त्याचे सुलभ अनुपालन होण्यासाठी विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध शैक्षणिक आणि संदर्भ साहित्याविषयीही संबंधित भागधारकांना यावेळी माहिती देण्यात आली.

भागधारकांशी सतत संवाद साधून आणि करदाता जनजागृती उपक्रमांद्वारे, नवीन कर प्रणालीच्या दिशेने होणारे स्थित्यंतर  सुरळीत आणि विनाव्यत्यय व्हावे यासाठीची प्राप्तिकर खात्याची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आली. 


निलीमा चितळे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2263302) अभ्यागत कक्ष : 20
Read this releasein: English