अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळा कडून माही बांसवाडा राजस्थान अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात 'मोबाईल मेडिकल युनिट' सेवेला आणखी एका वर्षासाठी मुदतवाढ

Posted On: 14 MAY 2026 10:03PM by PIB Mumbai

मुंबई, 14 मे 2026

राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाने आपल्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रम अर्थात सीएसआर अंतर्गत माही बांसवाडा राजस्थान अणुऊर्जा प्रकल्पाच्या (MBRAPP) परिसरात मोबाईल मेडिकल युनिट (MMU) सेवेला आणखी एका वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. या सेवेचे उद्घाटन आज माही बांसवाडा राजस्थान अणुऊर्जा प्रकल्पाचे प्रकल्प संचालक संदीप कुमार दास यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या मुंबईतल्या पश्चिम विभाग-I मुख्यालयाच्या सीएसआर निधीतून राबवला जाणारा हा मोबाईल मेडिकल युनिटचा उपक्रम स्थानिक समुदायाला सुलभ आरोग्य सेवा प्रदान करत आहे.

या कार्यक्रमाला ग्रामप्रतिनिधी आणि माही बांसवाडा राजस्थान अणुऊर्जा प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बांसवाडाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्प परिसरात महामंडळाकडून होत असलेले सातत्यपूर्ण सीएसआर उपक्रम आणि आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

मागील वर्षात या मोबाईल मेडिकल युनिटमध्ये 23 गावांचा समावेश करण्यात आला आणि त्यातून प्रकल्प परिसरातल्या 15,500 पेक्षा जास्त रुग्णांना वैद्यकीय मदत मिळाली.

स्थानिक भागधारकांचा सकारात्मक प्रतिसाद आणि वाढती मागणी लक्षात घेऊन, आता महामंडळाच्या सीएसआर उपक्रमांतर्गत एमएमयू सेवेचा विस्तार 26 गावांपर्यंत करण्यात आला आहे. राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ आपल्या प्रकल्प क्षेत्रांमध्ये आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करून समुदाय-केंद्रित कार्यक्रम राबवत आहे.

शैलेश पाटील/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2261260) अभ्यागत कक्ष : 18
Read this releasein: English