संरक्षण मंत्रालय
सीएपीएस-मुख्यालय देखभाल कमांड संयुक्त एरोस्पेस
नागपूर येथे 'संयुक्त एरोस्पेस पॉवर' चर्चासत्राचे आयोजन
Posted On:
13 MAY 2026 11:15AM by PIB Mumbai
भारतीय हवाई दलाच्या मुख्यालय देखभाल कमांडने सेंटर फॉर एअरपॉवर अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज या स्वायत्त संरक्षण थिंक टँकच्या सहयोगाने 11 मे 2026 रोजी नागपूर येथे एक दिवसीय 'संयुक्त एरोस्पेस पॉवर' या चर्चासत्राचे यशस्वीपणे आयोजन केले. ‘हवाई शक्तीची कार्यक्षम देखभाल आणि आत्मनिर्भरता वाढवणारे घटक’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या चर्चासत्रात लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित क्षेत्रातील तज्ञ आणि मान्यवर सहभागी झाले, आणि त्यांनी एरोस्पेस क्षमता वाढवण्यासाठी देखभालीतील कार्यक्षमता आणि स्वावलंबन, याच्या महत्वाच्या भूमिकेवर विचारमंथन केले.
एअर मार्शल यल्ला उमेश, व्हीएसएम, पीएचडी, एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, मेंटेनन्स कमांड, हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात, त्यांनी परिचालन सज्जता टिकवून ठेवण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी भक्कम देखभाल यंत्रणा आणि स्वदेशी क्षमता विकासाच्या निर्णायक महत्त्वावर भर दिला. त्यांनी अधोरेखित केले की, लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी, बाह्य स्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि मोहिमेची परिणामकारकता वाढवण्यासाठी एरोस्पेस प्रणालींमध्ये आत्मनिर्भरता प्राप्त करणे आवश्यक आहे.
या चर्चासत्रात भारताचे हवाई सामर्थ्य मजबूत करण्याच्या उद्देशाने नव्याने विकसित होणाऱ्या देखभाल पद्धती, तांत्रिक प्रगती, स्वदेशीकरण उपक्रम आणि धोरणात्मक आराखड्यांवर लक्ष केंद्रित करणारी अभ्यासपूर्ण सादरीकरणे आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. भारतीय हवाई दल आणि सीएपीएसएस मधील तज्ज्ञांनी संरक्षण उत्पादनातीलदेशाच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोना बरोबर देखभाल धोरणांची सांगड घालण्याबाबतचे आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाने ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी एक बहुमोल व्यासपीठ उपलब्ध करून दिले, आणि धोरणात्मक विचारवंत आणि परिचालन हितधारक यांच्यात अधिक खोलवर समन्वय साधला. या उपक्रमाने राष्ट्रीय उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी नाविन्यपूर्ण दृष्टिकोन स्वीकारण्याच्या आणि स्वदेशी क्षमता बळकट करण्याच्या भारतीय हवाई दलाच्या देखभाल कमानच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. एरोस्पेस देखभाल आणि क्षमता विकासामध्ये परिवर्तनात्मक बदल घडवून आणण्यासाठी, थिंक टँक (विचारवंत गट) आणि सशस्त्र दल, यांच्यातील सहयोग अधिक दृढ करण्याच्या सामायिक संकल्पाने चर्चासत्राचा समारोप झाला.


***
NehaKulkarni / Rajashreeagashe / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2260582)
अभ्यागत कक्ष : 27