अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्राप्तिकर विभाग, नागपूरच्या वतीने, प्राप्तिकर कायदा, 2025 संदर्भात जनजागृती करण्यासाठी “प्रारंभ-2026” या कार्यक्रमाचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 12 MAY 2026 9:07PM by PIB Mumbai

नागपूर, 12 मे 2026

प्राप्तिकर विभाग नागपूरच्या वतीने, प्राप्तिकर कायदा, 2025 आणि प्राप्तिकर नियम, 2026 च्या तरतुदींवर आधारित “प्रारंभ-2026” हा  एक लोकोपयोगी उपक्रम आणि जनजागृती कार्यक्रम दिनांक 14.05.2026 रोजी सकाळी 10:30 पासून चिटनवीस सेंटर, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे आयोजित केला जाणार   आहे.

नवा प्राप्तिकर कायदा, 2025 आणि प्राप्तिकर नियम, 2026 यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने, या विभागाच्या देशव्यापी करदाता आणि हितधारक सहभाग उपक्रमाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.

करदाते, व्यावसायिक, उद्योगजगताचे प्रतिनिधी आणि इतर संबंधितांना नवीन कायदेशीर चौकटीअंतर्गत करण्यात आलेल्या प्रमुख बदलांची माहिती देणे आणि जागरूकता निर्माण करणे तसेच संवादाद्वारे ऐच्छिक अनुपालनास प्रोत्साहन देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

सहभागींना करदात्यांना मिळणारी मदत आणि मार्गदर्शन या वैशिष्ट्यांचा अनुभव  तसेच ती समजून घेण्याकरीता या कार्यक्रमात विभागाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता-चलित “कर साथी” चॅटबॉटच्या विशेष हेल्पडेस्कची सोय देखील असेल, .

या जनजागृती कार्यक्रमात प्राप्तिकर कायदा, 2025 आणि प्राप्तिकर नियम, 2026 च्या महत्त्वाच्या पैलूंवर तांत्रिक आणि संवादात्मक सत्रे आयोजित केली जातील, ज्यामध्ये कर तरतुदींच्या सुलभीकरणाचा समावेश असेल. सहभागींना प्राप्तिकर कायदा, 1961 पासून नवीन प्राप्तिकर कायदा, 2025 पर्यंत  झालेल्या संक्रमणाचा आढावा देखील उपलब्ध केला जाईल.

हा उपक्रम पारदर्शी, करदात्यांसाठी अनुकूल आणि करप्रशासनाप्रती विभागाची असलेली निरंतर वचनबद्धता दर्शवतो.

प्राप्तीकर विभाग, नागपूर, संबंधितांना आणि व्यावसायिक व उद्योग क्षेत्रातील सदस्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यास तसेच संवादात्मक पध्दतीने प्राप्तिकराच्या नियमातील बदल जाणून घेण्यासाठी आमंत्रित करत आहे.

सुषमा काणे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2260460) आगंतुक पटल : 50
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English