केंद्रीय लोकसेवा आयोग
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल प्रबोधिनी लेखी परीक्षा (I), 2026 चा निकाल
Posted On:
08 MAY 2026 9:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मे 2026
केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे 12 एप्रिल 2026 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल प्रबोधिनीच्या (I), 2026 च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे, येथे नमूद केलेले आसन क्रमांक असलेले उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. 1 जानेवारी 2027 पासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 157 व्या तुकडीसाठी लष्कर, नौदल आणि हवाई दल शाखांमध्ये तसेच 119 व्या भारतीय नौदल प्रबोधिनी तुकडीमध्ये प्रवेशासाठी संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळातर्फे (एसएसबी) घेण्यात येणाऱ्या मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. हा निकाल आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
2. या यादीत ज्यांचे आसन क्रमांक दर्शवले आहेत, त्या सर्व उमेदवारांची उमेदवारी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. परीक्षेच्या प्रवेशाच्या अटींनुसार, "उमेदवारांना लेखी निकालाच्या घोषणेच्या दोन आठवड्यांच्या आत भारतीय लष्कराच्या 'joinindianarmy.nic.in' या भर्ती संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करण्याची विनंती करण्यात येत आहे. त्यानंतर यशस्वी उमेदवारांना निवड केंद्रे आणि सेवा निवड मंडळातर्फे मुलाखतीच्या तारखा कळवल्या जातील,आणि त्याची माहिती त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर दिली जाईल. ज्या उमेदवारांनी यापूर्वीच साईटवर नोंदणी केली आहे त्यांना पुन्हा ती करण्याची आवश्यकता नाही. कोणतीही शंका किंवा लॉगिनसंबंधी समस्या असल्यास, dir-recruiting6-mod[at]nic[dot]in वर ई-मेल पाठवावा."
"उमेदवारांना अशीही विनंती करण्यात येते की, त्यांनी सेवा निवड मंडळाच्या मुलाखतीदरम्यान संबंधित सेवा निवड मंडळांकडे वयाचे आणि शैक्षणिक पात्रतेची मूळ प्रमाणपत्रे सादर करावी." उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवू नयेत. अधिक माहितीसाठी, उमेदवार कोणत्याही कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 17:00 वाजेपर्यंत आयोगाच्या 'गेट सी' जवळील सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष किंवा 011-23385271/011-23381125/011-23098543 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधू शकतील. याव्यतिरिक्त, सेवा निवड मंडळ किंवा मुलाखतीशी संबंधित बाबींसाठी उमेदवारांनी लष्कर हा पहिला पसंतीक्रम असल्यास 011-26175473 किंवा joinindianarmy.nic.in वर, नौदल/नौदल प्रबोधिनी हा पहिला पसंतीक्रम असल्यास 011-23010097/ ई-मेल: officer-navy[at]nic[dot]in किंवा joinindiannavy.gov.in वर आणि हवाई दल हा पहिला पसंतीक्रम असल्यास 011-23010231 विस्तार क्रमांक (Extn.) 7645/7646/7610 किंवा www.careerindianairforce.cdac.in वर संपर्क साधावा.
3. उमेदवारांना हे देखील सूचित केले जाते की, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल प्रबोधिनी परीक्षा (I), 2026 चे गुण आणि कट-ऑफ गुण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल प्रबोधिनी परीक्षा (I), 2026 ची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच आयोगाच्या https://upsc.gov.in या वेबसाईटवर अपलोड केले जातील आणि तीस दिवसांच्या कालावधीसाठी आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध राहतील.
निकालासाठी येथे क्लिक करावे
* * *
शैलेश पाटील/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2259224)
अभ्यागत कक्ष : 8